Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले

स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले

दरकपातीची शक्यता झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 06:06 AM2024-10-03T06:06:06+5:302024-10-03T06:06:17+5:30

दरकपातीची शक्यता झाली कमी

Forget cheap petrol-diesel now; Clouds of War; Crude oil prices increased | स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले

स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दर घसरल्यानंतर भारतात पेट्राेल आणि डिझेलच्या दरकपातीकडे डाेळे लागले हाेते.  इराणने इस्रायलवर शेकडाे क्षेपणास्त्रे डागल्यानंतर पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाच दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलचे दर जवळपास ४ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पेट्राेल-डिझेलचे दर घटण्याची शक्यता मावळली आहे.

वर्षभरात कच्च्या तेलाचे दर एकीकडे सुमारे २४ टक्क्यांनी घसरले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचे सरासरी दर ६६ डाॅलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले हाेते. ब्रेंट क्रूडदेखील ७० डाॅलर प्रति बॅरलपर्यंत आले हाेते. मात्र, इराणच्या हल्ल्यानंतर मंगळवारी ब्रेंट क्रूड ७५.७९ डाॅलर प्रति बॅरवर गेले. टेक्सास क्रूड देखील ७२.१३ डाॅलरवर पाेहाेचले.

भारतावर कसा हाेताे परिणाम?
पश्चिम आशियामध्ये तणाव वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकतात. चालू वर्षात भारतात इंधनाची ८७.८ टक्के मागणी कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे 
पूर्ण करण्यात येते. 

बाजारपेठेवर इराणचे वर्चस्व
कच्च्या तेलाच्या पुरवठादार देशांची ‘ओपेक’ ही प्रमुख संघटना आहे. या संघटनेत इराण, साैदी अरब, यूएई आदी प्रमुख देश असून, इराणचे त्यात माेठे वर्चस्व आहे. त्यामुळे इराण-इस्रायल युद्ध भडकल्यास कच्च्या तेलाची माेठी दरवाढ हाेण्याची भीती आहे. १७ लाख बॅरेल एवढी कच्च्या तेलाची निर्यात इराण दरराेज करताे.

इंधन दरवाढीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम हाेताे?
n५० ते ६० पैशांनी पेट्राेल-डिझेलची दरवाढ १ डाॅलरने कच्च्या तेलाचे दर वाढल्यास हाेते. 
n१ डाॅलरने दर घटल्यास याच प्रमाणात पेट्राेल-डिझेलचे दर घटतात.
n११५ डाॅलर प्रति बॅरेलपेक्षा जास्त दर युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला पाेहाेचले हाेते.

गेल्या वर्षभरात असे राहिले ब्रेंट क्रूडचे दर 
२९ सप्टेंबर २०२३         ९७.०१ 
७ डिसेंबर २०२३         ७४.५०
९ एप्रिल २०२४         ९०.६०
४ जून २०२४          ७७.५० 
४ जुलै २०२४         ८७.४०
४ सप्टेंबर २०२४         ७२.९१
११ सप्टेंबर २०२४         ७०.१३
२ ऑक्टाेबर २०२४         ७५.७९

Web Title: Forget cheap petrol-diesel now; Clouds of War; Crude oil prices increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.