Lokmat Money > बिझनेस न्यूज > Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

Free LPG Cylinder Diwali: दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार १ लाख ८४ हजार ३९ लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलिंडरचा लाभ देणार आहे. पाहा कोणाला मिळणार या सेवेचा लाभ.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:05 AM2024-10-24T11:05:46+5:302024-10-24T11:05:46+5:30

Free LPG Cylinder Diwali: दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार १ लाख ८४ हजार ३९ लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलिंडरचा लाभ देणार आहे. पाहा कोणाला मिळणार या सेवेचा लाभ.

Free LPG Cylinde Before Diwali the central government gave a gift woman ujjwala yojana 1 84 lakh beneficiaries will get free gas cylinders | Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

Free LPG Cylinder Diwali: दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत १ लाख ८४ हजार ३९ लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलिंडरचा लाभ देणार आहे. गॅस सिलिंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकांना रोखीनं भरावी लागणार आहे. त्यानंतर तीन ते चार दिवसांत इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

या योजनेचा लाभ केवळ त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत २ लाख १९ हजार ६६७ ग्राहकांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १ लाख ८४ हजार ३९ ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर ३५ हजार ६२८ ग्राहकांचं आधार ऑथेंटिकेट झालेलं नाही. यासाठी डीएसओने सर्व गॅस एजन्सींना लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार ऑथेंटिकेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दोन वेळा मोफत सिलिंडरची योजना

केंद्र सरकारनं होळी आणि दिवाळीच्या सणाला दोनवेळा मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना आखली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधून आधार आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
ज्या लाभार्थ्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडलेली आहेत आणि ज्यांचं आधार ऑथेंटिकेट झालं आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत १४.२ किलोचा सिलिंडर मोफत दिला जाणार आहे. याबाबत ग्राहकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया डीएसओ शिवी गर्ग यांनी दिली.

२०१६ मध्ये योजनेची सुरुवात

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये केली होती. ग्रामीण भागातील घरांना मोफत एलपीजी सिलिंडर कनेक्शन देणं हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत १० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा झालाय. महिलांनी वर्षभर एलपीजी गॅस वापरावा यामुळे त्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर दिला जातो. तसंच गॅस जोडणीशी संबंधित इतर आवश्यक वस्तूही खरेदी करता याव्यात यासाठी कनेक्शन घेतल्यास १६०० रुपयांचं अर्थसहाय्यही दिले जाते. गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी सरकार ईएमआयची सुविधाही देते.

Read in English

Web Title: Free LPG Cylinde Before Diwali the central government gave a gift woman ujjwala yojana 1 84 lakh beneficiaries will get free gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.