सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीसाठी नव्या फॉर्म्युलाला एप्रिल महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. या फॉर्म्युलामुळे त्याच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंतची कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घरगुती गॅसच्या किंमती आता आंतरराष्ट्रीय हब गॅस ऐवजी इम्पोर्टेड क्रुड सोबत लिंक करण्यात आल्यात. त्यामळे आता घरगुती गॅसच्या किंमती भारतीय क्रुड बास्केटच्या किंमतीच्या १० टक्के असतील.
दर महिन्याला बदल
याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती दर महिन्याला निश्चित केल्या जाणार आहे. यापूर्वी त्यात वर्षातून दोन वेळा म्हणजेच सहा महिन्यांनी बदल केले जात होते. यापूर्वी घरगुती गॅससाठी ज्या किंमती निश्चित केल्या होत्या, त्यासाठी २०१४ मध्ये गाईडलाईन्स आल्या होत्या. त्यानुसार बाजारातील किंमतीच्या आधारे घरगुती बाजारात किंमती निश्चित केल्या जात होत्या.
समितीच्या सूचना
त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये किरीट पारीख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांची सूचवलेल्या बाबींनुसार गाईडलाईन्स तयार करण्यात आल्या.