Lokmat Money > बिझनेस न्यूज > गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण...

गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण...

Top Richest Person's Net Worth : जगभरातील बिलिनेअर उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचेही नुकसान झाले आहे. उद्योगपती गौतम अदानी १०० अरब डॉलर संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या यादीत बाहेर पडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 03:57 PM2024-09-08T15:57:02+5:302024-09-08T16:00:15+5:30

Top Richest Person's Net Worth : जगभरातील बिलिनेअर उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचेही नुकसान झाले आहे. उद्योगपती गौतम अदानी १०० अरब डॉलर संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या यादीत बाहेर पडले आहेत.

Gautam Adani, Mukesh Ambani hit! The wealth of billionaires has decreased because... | गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण...

गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण...

World Top Richest Net Worth fall : जगभरातील अब्जाधीशांना झटका बसला आहे. त्यांच्या संपत्ती कमी झाली असून, टॉप २० बिलिनेअर्संना याचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान एलन मस्क यांचे झाले आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. जगभरातील शेअर बाजारात घसरण झाल्याने अब्जाधीशांचे नुकसान झाले आहे. 

एलन मस्क, जेफ बेजोस यांना सर्वाधिक फटका

ब्लूमबर्ग बिलिनेअर्स इंडेक्सनुसार, एलन मस्क, जेफ बेजोस, मार्क झुकरबर्ग यांच्यापासून ते मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि बिल गेट्स या अब्जाधीशांच्या नेटवर्थमध्ये मोठी घट झाली आहे. 

टेस्ला, स्पेसएक्स सारख्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ एलन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांची नेटवर्थ १३.९ अरब डॉलरने (१.१४ लाख कोटी रुपये) कमी होऊन २३७ अरब डॉलरवर आली आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या अब्जाधीशांमध्ये दुसरे नाव जेफ बेजोस यांचे आहे. त्यांची संपत्ती ६.०८ अरब डॉलरने (५१००० कोटी रुपये) घटली असून, १९५ अरब डॉलरवर आली आहे. 

फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांची नेटवर्थ ५.७५ अरब डॉलरने (४८,२९३ कोटी रुपये) कमी होऊन १७८ अरब डॉलर इतकी झाली आहे. तर बिल गेट्स यांची संपत्ती १.१८ अरब डॉलरने (9910 कोटी रुपये) कमी झाली असून, सध्या त्यांची नेटवर्थ १५७ अरब डॉलर इतकी आहे.

मुकेश अंबानी, गौतम अदानीच्या संपत्तीत किती झाली घट?

भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचा परिणाम मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेटवर्थ २.१४ अरब डॉलरने (17,973 कोटी) कमी होऊन 11 अरब डॉलरवर आली आहे. मुकेश अंबानी जगातील अब्जाधीशांच्या यादीत ११ व्या स्थानी आहेत. 

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी ययांची नेटवर्थ १.५७ अरब डॉलरने (१३,१८६ कोटी) कमी झाली आहे. ९९.६ अरब डॉलर इतकी संपत्ती असल्याने उद्योगपती गौतम अदानी हे १०० अरब डॉलर संपत्ती असलेल्या अब्जाधीशांच्या यादीत बाहेर पडले आहेत. 

top richest billionaires in the world
top richest billionaires in the world

अब्जाधीशांची संपत्ती इतकी का घटली?

जगभरातील अब्जाधीशांना प्रचंड फटका बसला आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीत घट होण्यामागे शेअर बाजारात सुरू असलेली घसरणही कारणीभूत आहे. कंपन्यांचे शेअर घसरू लागले आहेत, त्याचा थेट परिणाम संपत्तीवर झाला आहे. 

Web Title: Gautam Adani, Mukesh Ambani hit! The wealth of billionaires has decreased because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.