Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

Adani Group News : पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय करते. अदानी समूहानं २०० कोटी रुपयांना हा करार केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 10:39 AM2024-09-28T10:39:04+5:302024-09-28T10:41:37+5:30

Adani Group News : पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय करते. अदानी समूहानं २०० कोटी रुपयांना हा करार केला आहे.

gautam adanis Adani Enterprises joint venture unit April Moon retail buys 74 percent stake in Cococart ventures rs 200 crore details | अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

Adani Group News : अदानी समूहातील आघाडीची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा संयुक्त उपक्रम एप्रिल मून रिटेलनं मोठा करार केला आहे. एप्रिल मून रिटेलने कोकोकार्ट व्हेंचर्सचा ७४ टक्के हिस्सा २०० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. अदानी एंटरप्रायझेसनं शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर किरकोळ वाढीसह ३१३१.१५ रुपयांवर बंद झाला.

काय म्हटलंय अदानींच्या कंपनीनं?

"आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड (एएमआरपीएल) या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या (एएएचएल) संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीनं कोकोकार्ट व्हेन्चर्सच्या शेअर्सच्या अधिग्रहणासाठी कंपनी आणि त्याचे विद्यमान भागधारक करण आहुजा तसंच अर्जुन आहुजा यांच्यासोबत २७ सप्टेंबर २०२४ रोजी पर्चेस अॅग्रीमेंट, जॉईंट व्हेन्चर अॅग्रीमेंट आणि शेअर सब्सक्रिप्शन अॅग्रीमेंट केलं आहे. यामुळे कंपनीला कोकोकार्ट व्हेंचर्समध्ये ७४ टक्के हिस्सा खरेदी करता येणार आहे. २०० कोटी रुपये किमतीचे हे अधिग्रहण ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल," असं अदानी एन्टरप्रायझेसनं म्हटलं.

काय करते कंपनी?

कोकोकार्ट व्हेंचर्स रिटेल आणि होलसेल अशा दोन्ही वस्तूंची खरेदी, विक्री, लेबलिंग, रिलेबलिंग, रिसेलिंग, आयात, निर्यात, वाहतूक, साठवणूक, प्रचार, किंवा पुरवठा या व्यवसायात गुंतलेली आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीची उलाढाल ९९.६३ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२३), ५१.६१ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२२) आणि ६.८९ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२१) होती.

Web Title: gautam adanis Adani Enterprises joint venture unit April Moon retail buys 74 percent stake in Cococart ventures rs 200 crore details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.