Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?

चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?

Silver Rate: देशाची राजधानी दिल्लीत चांदी एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 06:46 PM2024-10-13T18:46:15+5:302024-10-13T19:01:54+5:30

Silver Rate: देशाची राजधानी दिल्लीत चांदी एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे.

Gold and silver prices today on 13-10-2024, Check latest rates in cities | चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?

चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?

सध्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव एक लाख रुपयांहून अधिक होताना दिसत आहे. आज फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर साप्ताहिक सुट्टी आहे, त्यामुळं आज भाव फ्युचर्स मार्केटमध्ये नाही तर देशांतर्गत बाजारात दिसतील. चांदीचे दर एक लाख रुपयांच्या वर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत चांदी एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे.

चांदीचा दर जाणून घ्या
आज, चांदीच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, दिल्लीतील चांदीचे दर प्रति किलो 1,01,000 रुपयांच्या वर आहेत. हैदराबादमध्ये चांदीचा दर 1,03,000 रुपये प्रति किलो आहे. केरळमध्येही चांदी 1,03,000 रुपये प्रति किलोच्या वर पोहोचली आहे. तर देशातील अनेक राज्यांमध्ये चांदी 97,000 रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे. यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात किलोमागे 2000 रुपयांची वाढ झाली होती.

चांदीचा भाव 1 लाखांच्या पुढे का गेला?
देशात सोनं खूप महाग झालं आहे. आता गुंतवणूकदार सोन्याबरोबरच चांदीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळं सोन्यापेक्षा जास्त चांदी खरेदी करण्यात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. यानंतर सोन्याच्या तुलनेत चांदीच्या वाढीची टक्केवारी अधिक झाली असून आज पुन्हा एकदा चांदी एक लाख रुपयांच्या वर पोहोचली आहे. चांदीचा वापर उद्योगांमध्येही केला जातो आणि सध्या चांदीमध्ये उच्च पातळी दिसून येत आहे. कारण देशात औद्योगिक उपक्रम वेगाने सुरू आहेत.

देशातील विविध शहरांमध्ये चांदीची किंमत
- अहमदाबादमध्ये चांदीची किंमत 97,000 रुपये प्रति किलो आहे.
- अयोध्येत चांदीची किंमत 97,000 रुपये प्रति किलो आहे.
- दिल्लीत चांदीची किंमत 1,01,000 रुपये प्रति किलो आहे.
- हैदराबादमध्ये चांदीची किंमत 1,03,000 रुपये प्रति किलो आहे.
- केरळमध्ये चांदीची किंमत 1,03,000 रुपये प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत किती?
आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ होत असून या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 1.58 टक्क्यांच्या वाढीनंतर चांदीचा दर प्रति औंस 31.735 डॉलरवर आला असून सातत्याने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Gold and silver prices today on 13-10-2024, Check latest rates in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.