Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

Gold Price Today : भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:43 IST2025-04-22T13:42:59+5:302025-04-22T13:43:30+5:30

Gold Price Today : भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.

gold broke all records price crossed one lakh know 1 gram rate in your city today | सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोने १ लाखांच्या पुढे जाणार, अशी चर्चा होती. अखेर आज तो दिवस उजाडला आहे. देशात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई सारख्या इतर अनेक प्रमुख शहरांमध्ये, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. सोमवारी संध्याकाळी अमेरिकेत सोन्याचा वायदा १.७ टक्क्यांनी वाढून ३,४८२.४० डॉलरवर पोहोचला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील तणावामुळे गुंतवणूकदारांचा अमेरिकेच्या आर्थिक धोरणावरील विश्वास डळमळीत होत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. तुमच्या शहरातील दर माहिती आहे का?

एक तोळा सोन्याची किंमत किती?
गुड रिटर्न्सच्या मते, आज मुंबई, पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १,०१,३५० रुपये आहे. तर २२ कॅरेटची किंमत थोडी कमी आहे. याची किंमत ९२,९०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या १० ग्रॅमसाठी १,०१,५०० रुपये आहे. तर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या २२ कॅरेट सोन्याची प्रति १० ग्रॅमची किंमत ९३,०५० रुपये आहे.

तुमच्या शहरात १ ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे?

  • दिल्ली: १०,१५० रुपये
  • नोएडा: १०,१३५ रुपये
  • गुरुग्राम: १०,१३५ रुपये
  • मुंबई: १०,१३५ रुपये
  • पुणे : १०,१३५ रुपये
  • चेन्नई: १०,१३५ रुपये
  • बेंगळुरू: १०,१३५ रुपये
  • कोलकाता: १०,१३५ रुपये

वाचा - मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?

सोने हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतात सोन्याच्या दागिन्यांशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत, जगभरातील बाजारपेठांमध्ये सुरू असलेल्या अशांततेदरम्यान, लोक स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करत आहेत. सोन्याची मागणी वाढल्यानेही किंमत वाढली आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक ०.१६ टक्क्यांनी घसरून ९८.१२ च्या आसपास व्यवहार करत आहे. कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

Web Title: gold broke all records price crossed one lakh know 1 gram rate in your city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.