Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

Gold Investment Options: सण-उत्सवाच्या काळात सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे दिवाळीसह इतर काही सणांना लोक मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने सोन्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजे दागिने खरेदी करतात. पण, गुंतवणूक करण्यासाठी इतरही पर्याय आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 03:35 PM2024-10-06T15:35:44+5:302024-10-06T15:36:52+5:30

Gold Investment Options: सण-उत्सवाच्या काळात सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे दिवाळीसह इतर काही सणांना लोक मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने सोन्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजे दागिने खरेदी करतात. पण, गुंतवणूक करण्यासाठी इतरही पर्याय आहेत.  

Gold Investment: Instead of buying jewellery, invest in gold in 'these' 5 ways; You will get a lot of interest | Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

Type of Gold Investment: भारतात सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी होते. सणाच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असते. त्यामुळे अजूनही लोकांचा कल दागिने खरेदी करून गुंतवणूक करण्याकडेच जास्त आहे. पण, आता सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. त्यातून चांगला रिटर्नही मिळतात. त्यामुळे जाणून घ्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय...

सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond)

गोल्ड बाँडला मराठीमध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे म्हणतात. हे बाँड सरकारकडून विकले जातात. यातील एक अडचण म्हणजे हे तुम्ही कधीही खरेदी करू शकत नाही. सरकार वर्षातून एक किंवा दोन वेळा या गोल्ड बाँडची विक्री करते. ही विक्री आठवडाभर असते. यातील गुंतवणूकही तुम्हाला चांगला परतावा मिळून देऊ शकते. 

गोल्ड ETF

गोल्ड ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड) हा असा म्युच्युअल फंड आहे, जो सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. हा फंड शेअर बाजाराप्रमाणे काम करतो. यामाध्यमातून तुम्ही कधीही सोने खरेदी-विक्री करू शकता. गोल्ड ETF मधील गुंतवणूक तुम्हाला सोन्याबरोबरच शेअर मार्केटप्रमाणे स्वातंत्र्यही देते. म्हणजे तुम्हीही कधीही खरेदी विक्री करू शकता.  

डिजिटल गोल्ड

हल्ली तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही सोने खरेदी करू शकता, यालाच डिजिटल गोल्ड म्हणतात. फोनपे आणि गुगल पे या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सोने खरेदी करू शकता. तुम्ही अगदी १ रुपयांपासून सोने खरेदी करू शकता. हे ॲप सेफगोल्ड किंवा MMTC-PAMP या कंपन्यासोबत भागीदारी करून सोने खरेदी विक्री करतात, त्यामुळे ते सुरक्षित असते. यात तुम्हाला सोने जवळ बाळगण्याची चिंताही नसते. 

गोल्ड कॉईन्स

बँक, सराफा दुकान, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आणि ई-कॉमर्स साईटवर सोन्याची नाणी उपलब्ध असतात या सोन्याच्या नाण्यांवर BIS हॉलमार्क असतो, जो सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाण आहे. सोन्याची नाणी नेहमी टेम्पर प्रूफ पॅकिंगमध्येच खरेदी करायला हवी, म्हणजे फसवणूक किंवा नुकसान टाळता येते. ०.५ ग्रॅमपासून ते ५० ग्रॅमपर्यंत ही नाणी उपलब्ध असतात. 

सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे तोटे

भारतीय पारंपरिकपणे सोने खरेदी करायचे असेल, तर दागिनेच खरेदी करतात. पण, त्याचे काही तोटेही आहेत. यात दागिन्याची डिझाईन जुनी होते. त्यामुळे पुन्हा नवीन बनवून घ्यायची असेल, तर खर्च येतो. दागिण्याची डिझाईन खूपच किचकट असेल, त्याच्या घडवणीचा खर्चही जास्त असतो. त्याचबरोबर अनेकदा दागिण्यातील सोन्यातून फसवणूकही होण्याची शक्यता असते. 

Web Title: Gold Investment: Instead of buying jewellery, invest in gold in 'these' 5 ways; You will get a lot of interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.