Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

आज सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 48,910 रुपयांवर बंद झाला. सकाळी 10.30 पर्यंतच्या व्यवसायादरम्यान, सोन्याचा भाव 48,933 रुपये आणि किमान 48,858 रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:00 PM2020-07-20T12:00:45+5:302020-07-20T12:02:34+5:30

आज सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 48,910 रुपयांवर बंद झाला. सकाळी 10.30 पर्यंतच्या व्यवसायादरम्यान, सोन्याचा भाव 48,933 रुपये आणि किमान 48,858 रुपयांवर पोहोचला.

gold silver price 20 july bullion market latest update | सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

एकीकडे शेअर्स मार्केट(Share Market)मध्ये वाढ झालेली दिसत असतानाच दुसरीकडे फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्याचे भाव (Gold Price Today) खाली आलेले दिसत आहेत. आज सकाळी सोन्याचे भाव गडगडले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,967 रुपयांवर बंद झाले. आज सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 48,910 रुपयांवर बंद झाला. सकाळी 10.30 पर्यंतच्या व्यवसायादरम्यान, सोन्याचा भाव 48,933 रुपये आणि किमान 48,858 रुपयांवर पोहोचला. सकाळी 10.30 वाजता सोन्याचा दर 10 ग्रॅम 48,915 रुपयांच्या पातळीवर होता.

शुक्रवारी सोन्याची किंमत किती होती
स्पॉटची कमकुवत मागणीमुळे व्यापा-यांनी त्यांचे सौदे कमी केले आणि यामुळे शुक्रवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याला प्रति दहा ग्रॅम 0.05 टक्क्यांनी तोटा झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिलिव्हरी सोन्याचा दर ऑगस्टमध्ये 23 रुपये किंवा 0.05 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 48,750 रुपयांवर आला. 8,473 लॉटसाठी व्यापार करण्यात आला. ऑक्टोबरमधला सोन्याचा वायदा बाजारातील दर 36 ग्रॅम किंवा 0.07 टक्क्यांनी घसरून 48,894 रुपयांवर आला. त्यात 11,248 लॉटसाठी व्यापार झाला. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे 0.35 टक्क्यांनी घट होऊन ते प्रति औंस 1,807.40 डॉलरवर बंद झाले.
दिल्ली सराफा बाजाराची ही स्थिती आहे

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 271 रुपयांनी घसरून 49,729 रुपयांवर बंद झाले. बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 50,000 रुपयांवर पोहोचले होते. चांदीचा दरही 512 रुपयांनी घसरून 53,582 रुपयांवर आला. गुरुवारी त्याची बंद किंमत 53,894 रुपये होती. शुक्रवारी रुपया 16 पैशांनी मजबूत होऊन अमेरिकी चलनाच्या तुलनेत 75.02 वर बंद झाला. या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील तेजीचा कल आणि अमेरिकन चलन कमकुवत होणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 1,801.5 डॉलर होते तर चांदीची किंमत प्रति औंस 19.08 डॉलर इतकी आहे.
यावर्षी सोन्याच्या दरात 25 टक्क्यांनी वाढ 
या वर्षाच्या सुरुवातीस, सोन्याचे दर 10 ग्रॅम 39 हजार रुपये होते, जे आतापर्यंत 49,500 च्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. फ्युचर्स मार्केटमध्ये सध्या सोने 49 हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गोल्फ ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर
चालू वर्ष 2020च्या पहिल्या सहामाहीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)ची 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात गुंतवणूकदार मालमत्तेत गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत, ज्यामुळे सोन्याचे ईटीएफचे आकर्षण वाढले आहे. यामुळे मागील वर्षाच्या याच सहामाहीत म्हणजेच जानेवारी-जून 2019 दरम्यान सोने ईटीएफमधून 160 कोटी रुपये काढले गेले. या श्रेणीने गेल्या एक वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आकडेवारीनुसार ऑगस्ट 2019 पासून गोल्ड ईटीएफमध्ये 3,723 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. यावर्षी 30 जून रोजी संपलेल्या सहामाहीत गोल्ड ईटीएफला 3,530 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

सोन्याची आयात 94 टक्क्यांनी कमी झाली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील सोन्याची आयात 94 टक्क्यांनी 68.8 कोटी डॉलर किंवा 5,160 कोटी रुपयांवर आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती मिळाली आहे. सोन्याच्या आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्यातील तूट (सीएडी) वर होतो. कोरोनाच्या साथीच्या आजारामुळे सोन्याची मागणी कमी झालेली असून, सोन्याची आयातीत घसरण झाली आहे. त कमी करणार्‍या  आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत यलो धातूची आयात 11.5 अब्ज डॉलर किंवा 86,250 कोटी रुपये होती. याच कालावधीत चांदीची आयात 45 टक्क्यांनी घटून 57.5 दशलक्ष डॉलर किंवा 4,300 कोटी रुपयांवर गेली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे. दागिने उद्योगासाठी येथे मुख्यतः सोन्याची आयात केली जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो.

हेही वाचा

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

Web Title: gold silver price 20 july bullion market latest update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.