Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...

Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...

Gold Silver Price Review: ऑक्टोबरमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीनं मागील सर्व विक्रम मोडले होते. महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:07 PM2024-11-01T15:07:26+5:302024-11-01T15:16:58+5:30

Gold Silver Price Review: ऑक्टोबरमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीनं मागील सर्व विक्रम मोडले होते. महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे

Gold Silver Price Review Silver Bullish Than Gold Gold went up by rs 4360 in October while silver price hike by 7270 | Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...

Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...

Gold Silver Price Review: ऑक्टोबरमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीनं मागील सर्व विक्रम मोडले होते. दिवाळीत सोनं ७९५५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं असले तरी या महिन्यात धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी सोन्यानं ७९५८१ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. तर चांदीनं २३ ऑक्टोबर रोजी ९९,१५१ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.

फक्त ऑक्टोबरबद्दल बोलायचं झालं तर ३० सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव ४३६० रुपयांनी वाढून ७५,१९७ रुपयांवरून वाढून ७९,५५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. मात्र, चांदीचा वेग सोन्यापेक्षा दुप्पट आहे. एका महिन्यात सोनं ४३६० रुपयांनी तर चांदी ७२७० रुपयांनी वधारली. ३० सप्टेंबर रोजी एक किलो चांदीचा भाव ८९४०० रुपये होता. हा दर आयबीएनं जारी केलेले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.

वर्षभरात सोन्यात १६,२०५ रुपयांची तेजी

यावर्षी सोने प्रति १० ग्रॅम ६२०५ रुपयांनी महागलं आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३३५२ रुपये होती. मात्र, या कालावधीत चांदी ७३३९५ रुपयांवरून ९६६७० रुपये प्रति किलो झाली आहे. या कालावधीत यात २३२७५ रुपयांची वाढ झाली.

दर का वाढत आहेत?

जगातील भूराजकीय तणावाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत, कारण असुरक्षित वातावरणात गुंतवणुकीसाठी सोनं हा गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे सर्वसामान्यां बरोबरच जगातील सर्व मध्यवर्ती बँकाही सोन्याचा साठा वाढवत आहेत.

आता काय करायचं?

सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, त्यामुळे भाव घसरण्याची वाट पाहण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढू शकतो. संपूर्ण वर्षभर सोन्याची मागणी ७०० ते ७५० टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याची एकूण मागणीही वाढण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये भारताची सोन्याची मागणी ७६१ टन होती.

Web Title: Gold Silver Price Review Silver Bullish Than Gold Gold went up by rs 4360 in October while silver price hike by 7270

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.