Lokmat Money > बिझनेस न्यूज > खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना

खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना

शॉपिंग करणं ही बऱ्याच जणांच्या आवडीची गोष्ट असते, अनेक शॉपिंग करत असताना कंपन्यांना वेगवेगळी गिफ्ट किंवा बक्षीस जिंकण्याची संधी देत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 09:25 PM2020-02-04T21:25:49+5:302020-02-04T21:27:09+5:30

शॉपिंग करणं ही बऱ्याच जणांच्या आवडीची गोष्ट असते, अनेक शॉपिंग करत असताना कंपन्यांना वेगवेगळी गिफ्ट किंवा बक्षीस जिंकण्याची संधी देत असतात.

goverment plans gst lottery offer between 10 lac to 1 crore | खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना

खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना

Highlightsअनेकदा शॉपिंग करत असताना कंपन्या वेगवेगळी गिफ्ट किंवा बक्षीस जिंकण्याची संधी देत असतात.दा कोणत्याही कंपनीनं नव्हे, तर केंद्र सरकारनं एक भन्नाट योजना आणली आहे. ज्यात आपण 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम जिंकू शकतो.

नवी दिल्लीः शॉपिंग करणं ही बऱ्याच जणांच्या आवडीची गोष्ट असते, अनेकदा शॉपिंग करत असताना कंपन्या वेगवेगळी गिफ्ट किंवा बक्षीस जिंकण्याची संधी देत असतात. परंतु यंदा कोणत्याही कंपनीनं नव्हे, तर केंद्र सरकारनं एक भन्नाट योजना आणली आहे. ज्यात आपण 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम जिंकू शकतो. फक्त काही सामान खरेदी करायचं आहे आणि त्याचं जीएसटीचं बिल आवर्जून घ्यायचं आहे. 

वस्तू आणि सेवा करा(जीएसटी)ची लॉटरी योजना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळा(सीबीआईसी)चे सदस्य जॉन जोसेफ यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात याचा खुलासा केला आहे. जीएसटीच्या प्रत्येक बिलावर लॉटरी जिंकण्याची संधी मिळणार आहे. या नव्या योजनेमुळे ग्राहक कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहित होतील, असा अर्थमंत्रालयाचा कयास आहे. 

असोचेमच्या एका कार्यक्रमात जोसेफ म्हणाले, आम्ही एक नवी लॉटरी प्रणाली घेऊन आलो आहोत. प्रत्येक जीएसटी बिलावर ही लॉटरी जिंकता येणार आहे. त्यासाठी ड्रॉ काढला जाणार आहे. लॉटरीचं मूल्य मोठं असल्यानं ग्राहकाला त्याचा फायदा होणार असून, 10 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतच बक्षीस जिंकण्याची संधी मिळाली आहे. 

बिलाच्या पोर्टलवर करावं लागणार अपलोड
या योजनेंतर्गत जीएसटी बिलाला पोर्टलवर अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर प्रणालीअंतर्गत ड्रॉ काढला जाणार आहे. त्यानंतर विजेत्यांना याची यादी देण्यात येणार आहे. 

जीएसटी परिषद करणार समीक्षा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषद या लॉटरी योजनेची समीक्षा करणार आहे. त्याचदरम्यान किमान बिलाची मर्यादा ठरवण्यात येणार आहे. विजेत्यांना पुरस्कार ग्राहक कल्याण निधीतून दिला जाणार आहे. 
 

Web Title: goverment plans gst lottery offer between 10 lac to 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी