Lokmat Money > बिझनेस न्यूज > HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?

HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?

HAL Share Price : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) सरकार 'महारत्न'चा दर्जा देऊ शकते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना सरकार महारत्नाचा दर्जा देते. पाहा यानं काय फरक पडू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:35 PM2024-09-20T13:35:57+5:302024-09-20T13:38:25+5:30

HAL Share Price : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) सरकार 'महारत्न'चा दर्जा देऊ शकते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना सरकार महारत्नाचा दर्जा देते. पाहा यानं काय फरक पडू शकतो?

HAL Stocks price Hindustan Aeronautics Soon to Become Maharatna Company Why will you earn by investing even now | HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?

HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?

HAL Share Price : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) सरकार 'महारत्न'चा दर्जा देऊ शकते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना सरकार महारत्नाचा दर्जा देते. एचएएल विविध प्रकारची एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स तयार करते. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही कंपनी अत्यंत महत्त्वाची आहे. लष्करासाठी लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे. तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हॉक अॅडव्हान्सडेट ट्रेनर, डॉर्नियर डीओ-२२८ मल्टीपर्पज लाइट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एसयू-३० एमकेआय यांसारख्या विमानांचा यात समावेश आहे.

५ वर्षात १०४५% परतावा

एचएएलचा शेअर गेल्या वर्षभरात ११६ टक्क्यांनी वधारला आहे. २० सप्टेंबर रोजी बाजार उघडल्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात याचा एनएसईवर त्याचा भाव २.१२ टक्क्यांनी वधारून ४,३२१ रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या ५ वर्षात या शेअरनं १,०४५% परतावा दिला आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी या शेअरची किंमत ३७८ रुपये होती. मे २०२० मध्ये शेअरचा भाव २६७ रुपयांपर्यंत घसरला होता. तेव्हापासून या शेअरमध्ये कमालीची तेजी दिसून आली आहे. यात सरकारच्या धोरणाचा मोठा वाटा आहे. सरकार आयात करण्याऐवजी संरक्षण उपकरणं देशातच तयार करण्यावर भर देत आहे. याचा फायदा एचएएलला होत आहे.

१ कोटींपेक्षा अधिकची ऑर्डर बुक

एचएएलला नुकताच सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत कंपनी एसयू-३० एमकेआय विमानांसाठी २४० एल-३१ एफपी एअरो इंजिन तयार करणार आहे. या ऑर्डरची किंमत सुमारे २६,००० कोटी रुपये आहे. यावर्षी ३१ मार्च अखेर एचएएलची ऑर्डर बुक ९४,००० कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ११ टक्क्यांनी वाढून ४,३५० कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा नफा ७,६२१ कोटी रुपये होता. संरक्षण उपकरणांच्या निर्यातीवरही सरकार भर देत आहे. याचा फायदा एचएएलला नक्कीच होण्याची शक्यता आहे.

... तर शेअर्समध्ये येऊ शकते तेजी

सरकार आपल्या कंपन्यांचं त्यांच्या कामगिरीच्या आधारे मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करते. सध्या १३ सरकारी कंपन्यांचा महारत्न दर्जा आहे. यामध्ये भेल, बीपीसीएल, कोल इंडिया, गेल, इंडियन ऑइल, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, सेल, ऑइल इंडिया, आरईसी आणि पीएफसी यांचा समावेश आहे. 

महारत्नाचा दर्जा मिळाल्यानंतर कंपनी आपल्या नेटवर्थच्या १५ टक्के रक्कम सरकारच्या परवानगीशिवाय एखाद्या प्रकल्पात गुंतवू शकते. सरकारच्या परवानगीशिवाय ते परदेशात पाच हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. महारत्नाचा दर्जा मिळाल्यानंतर एचएएलच्या झपाट्यानं वाढीचा मार्ग मोकळा होईल, असा अंदाज आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: HAL Stocks price Hindustan Aeronautics Soon to Become Maharatna Company Why will you earn by investing even now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.