Lokmat Money > बिझनेस न्यूज > NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर

NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर

NTPC Green Energy IPO Allotment: वीज क्षेत्रातील दिग्गज एनटीपीसीची ग्रीन एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीनच्या १०,००० कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:09 PM2024-11-25T13:09:38+5:302024-11-25T13:09:38+5:30

NTPC Green Energy IPO Allotment: वीज क्षेत्रातील दिग्गज एनटीपीसीची ग्रीन एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीनच्या १०,००० कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Have you been allotted share of NTPC How to check see step by step procedure | NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर

NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर

NTPC Green Energy IPO Allotment: वीज क्षेत्रातील दिग्गज एनटीपीसीची ग्रीन एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीनच्या १०,००० कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला हिस्साही पूर्णपणे भरला गेला नाही. आता कंपनीच्या शेअर्सचं अलॉटमेंट होणार आहे. एकदा अलॉटमेंट फायनल झाल्यानंतर ते बीएसईच्या वेबसाइटवर किंवा रजिस्ट्रार केफिन टेकच्या वेबसाइटवर पाहता येईल. 

ग्रे मार्केटबद्दल बोलायचं झालं तर एनटीपीसीचे शेअर्स ३.५० रुपयांच्या जीएमपीवर (GMP ) आहेत. म्हणजेच आयपीओच्या अपर प्राइस बँडमधून ३.२४% म्हणजेच लिस्टिंगमध्ये केवळ ३% पेक्षा जास्त लिस्टिंग गेन मिळू शकतो.

मात्र मार्केट एक्सपर्टच्या मते, लिस्टिंगच्या दिवशी कंपनीची बिझनेस हेल्थ आणि मार्केटची स्थिती यावर सर्वकाही अवलंबून असतं. ह्युंदाई मोटरच्या विक्रमी २७,८७० कोटी रुपये आणि स्विगीच्या ११,३०० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर एनटीपीसी ग्रीनचा १०,००० कोटी रुपयांचा आयपीओ हा या वर्षीचा तिसरा सर्वात मोठा इश्यू होता.


BSE च्या साईटवर चेक करा

 

  • https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx, या लिंकवर जा.
  • 'Equity' हा इश्यू प्रकार निवडा. NTPC Green Energy नावाचा इश्यू निवडा.
  • अर्ज क्रमांक किंवा पॅन भरा.
  • त्यानंतर I'm not a robot वर क्लिक करा.
  • सर्चवर क्लिक करा.
  • शेअर्सच्या अलॉटमेंट स्टेटसवरून स्क्रीनवर किती शेअर्सचं अलॉटमेंट झालंय हे दिसून येईल.
     

रजिस्ट्रारच्या साईटवर कसं चेक कराल

  • https://ris.kfintech.com/ipostatus/ या लिंकवर जा. या ठिकाणी तुम्हाला पाच लिंक्स दिसतील. त्यापैकी एकावर क्लिक करा.
  • सिलेक्टवर क्लिक करून आयपीओ निवडा आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी निवडा.
  • अर्ज क्रमांक, डीमॅट खातं आणि पॅन यापैकी कोणताही पर्याय निवडा. त्यानंतर निवडलेल्या पर्यायानुसार माहिती एन्टर करा .
  • कॅप्चा भरून सबमिट करा.
  • शेअर्सच्या अलॉटमेंट स्टेटसवरून स्क्रीनवर किती शेअर्सचं वाटप झालं हे तुम्हाला दिसून येईल.


(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Have you been allotted share of NTPC How to check see step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.