Lokmat Money > बिझनेस न्यूज > Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल यांचा पगार किती? ट्विटर वर्षाला किती डॉलर मोजणार, जाणून घ्या...

Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल यांचा पगार किती? ट्विटर वर्षाला किती डॉलर मोजणार, जाणून घ्या...

Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल सध्या कंपनीमध्ये सीटीओ (चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर) म्हणून काम करत आहेत. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:38 PM2021-12-01T19:38:38+5:302021-12-01T19:39:54+5:30

Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल सध्या कंपनीमध्ये सीटीओ (चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर) म्हणून काम करत आहेत. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे.

how much salary Parag Agarwal will get as Twitter's CEO; 1 million Dollar package and bonus | Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल यांचा पगार किती? ट्विटर वर्षाला किती डॉलर मोजणार, जाणून घ्या...

Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल यांचा पगार किती? ट्विटर वर्षाला किती डॉलर मोजणार, जाणून घ्या...

दोन दिवसांपूर्वी ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल (Parag Agarwal) याची नियुक्ती झाली. दहा वर्षांपूर्वी इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये नोकरी पत्करलेल्या पराग यांनी मोठी झेप घेतली. परंतू पराग यांना ट्विटर किती पगार देते, यावर भारतीयांनी सर्च करायला सुरुवात केली आहे. 

पराग अग्रवाल सध्या कंपनीमध्ये सीटीओ (चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर) म्हणून काम करत आहेत. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स विषयात पीएचडी केली होती. AT&T, याहू आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम केल्यानंतर पराग यांनी २०११ मध्ये ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना ट्विटरमध्ये चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदी बढती देण्यात आली होती. 

आता प्रश्न सुरु झाला तो पराग अग्रवाल यांना ट्विटर किती पगार देते. तर जाणून घ्या. पराग अग्रवाल यांना ट्विटर वर्षाला 1 दशलक्ष डॉलर एवढा म्हणजेय वर्षाला सुमारे 7.5 कोटी रुपये पगार देते. यामध्ये बोनस आणि अन्य गोष्टी देखील आहेत. त्यांना बेसिक सॅलरीच्या 150 टक्के बोनसही आहे. तसेच ट्विटरने पराग यांना 12,500,000 डॉलर एवढ्या दर्शनी मुल्याचे प्रतिबंधित स्टॉक युनिट्स (RSUs) देखील दिलेले आहेत. 

दहा वर्षांपूर्वी पराग अग्रवाल काय होते?
जगभरात छोट्या छोट्या गोष्टींवरून टिवटिव करणारा प्लॅटफॉर्म ट्विटरच्या सीईओ पदाचा जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला. ट्विटरचे नवे सीईओ म्हणून एक अस्सल भारतीय पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्या नावाची घोषणा झाली. बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने पराग अग्रवाल यांचे ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्याबद्दल ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. 11 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीसाठी घोषालने आपल्या चाहत्यांना त्याला फॉलो करण्याची विनंती केली होती, तोच व्यक्ती आज ट्विटरचा सीईओ झाला आहे. श्रेया आणि पराग हे लहानपणीपासूनचे मित्र आहेत. 
 

Web Title: how much salary Parag Agarwal will get as Twitter's CEO; 1 million Dollar package and bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.