Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित सदस्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. पाहा काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:39 PM2024-11-29T14:39:02+5:302024-11-29T14:39:02+5:30

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित सदस्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. पाहा काय आहे हे प्रकरण?

Important News for EPFO Employees activate UAN by November 30 Otherwise there will be a big loss | EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित सदस्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. ईपीएफओद्वारे चालविल्या जाणाऱ्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ELI) योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्हेट करावा लागेल आणि बँक खात्याशी आधार लिंक करावा लागेल. सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांनी तसं न केल्यास त्यांना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्हचा लाभ मिळणार नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्यांकडे या प्रक्रियेसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे. त्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे.

३० नोव्हेंबर अखेरची तारीख

एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचे तीन कॅटेगरी A.B.C असे आहेत आणि जुलै २०२४ मध्ये सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली होती. ईएलआय योजनेत प्रथमच सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे (DBT) लाभ मिळतो. अशा तऱ्हेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी आपलं यूएएन अॅक्टिव्हेट करावं लागेल, तर आधार कार्ड बँकेशी लिंक करावं लागेल.

यूएएन कोण अॅक्टिव्हेट करू शकेल?

  • स्टेप १: यूएएन अॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ मेंबरला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर जावं लागेल.
  • स्टेप २: त्यानंतर महत्वाच्या लिंक सेक्शनमध्ये जा आणि अॅक्टिव्ह यूएएनवर क्लिक करा.
  • स्टेप ३: या ठिकाणी आपला यूएएन नंबर, आधार नंबर, जन्मतारीख आणि आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाका. यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल.
  • स्टेप ४: ओटीपी टाकून अॅक्टिव्हेशन पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल.
     

यूएएन अॅक्टिव्हेट झाल्यानंतर कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्याचा तपशील, पीएफ पासबुक पाहणं आणि डाउनलोड करणं, पैसे काढणं, आगाऊ किंवा हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन क्लॉम सादर करणं, वैयक्तिक तपशील अपडेट करणं यासह ईपीएफओसंबंधित सेवांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकता.

Web Title: Important News for EPFO Employees activate UAN by November 30 Otherwise there will be a big loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.