Lokmat Money > बिझनेस न्यूज > आठ दिवसांत सोने ५, चांदी ११ हजारांनी गडगडली

आठ दिवसांत सोने ५, चांदी ११ हजारांनी गडगडली

सोने ७० हजारांच्या आत : चांदीही अडीच महिन्यांच्या नीचांकी भावावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 05:32 AM2024-07-27T05:32:10+5:302024-07-27T05:32:19+5:30

सोने ७० हजारांच्या आत : चांदीही अडीच महिन्यांच्या नीचांकी भावावर

In eight days, gold fell by 5000 rs, silver by 11 thousand rupees after Budget 2024, Know gold rate today | आठ दिवसांत सोने ५, चांदी ११ हजारांनी गडगडली

आठ दिवसांत सोने ५, चांदी ११ हजारांनी गडगडली

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी केल्याच्या घोषणेनंतर या मौल्यवान धातूंचे भाव कमी-कमी होत आहेत. शुक्रवारी सोने ६९ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदी ८२ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. गेल्या आठ दिवसांत सोने पाच हजार, तर चांदी ११ हजार रुपयांनी घसरली आहे.

मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा करण्यात आली. मंगळवारपासूनच भाव कमी होण्यास सुरुवात झाली. बुधवारी सोने ७०० रुपयांनी घसरले व गुरुवारी पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ६९ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले.

शुक्रवारी ते याच भावावर स्थिर होते. मात्र, गेल्या आठवडाभरातील स्थिती पाहिली, तर १८ जुलै रोजी सोने ७४ हजार ५०० रुपयांवर होते. आठ दिवसांत सोने ७४ हजार ५०० रुपयांवरून शुक्रवारी ६९ हजार ५०० रुपयांवर आले. दुसरीकडे, चांदीच्याही भावात गुरुवारी थेट तीन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार ५०० रुपयांवर आली होती. 

शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाल्याने चांदी ८२ हजार रुपयांवर आली. १८ जुलै रोजी चांदी ९३ हजार रुपये प्रतिकिलोवर होती, आठ दिवसांत ११ हजार रुपयांची घसरण होऊन ती ८२ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

Web Title: In eight days, gold fell by 5000 rs, silver by 11 thousand rupees after Budget 2024, Know gold rate today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं