Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती

रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती

रेशन कार्ड हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. रेशन कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरता येऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:59 PM2024-09-24T13:59:27+5:302024-09-24T14:00:36+5:30

रेशन कार्ड हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. रेशन कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरता येऊ शकतं.

In how many days it will take to add new members name in ration card Read the full details you may need to know | रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती

रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती

रेशन कार्ड हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. हे केवळ सरकारकडून मोफत देण्यात येणाऱ्या धान्यासाठीच नाही, तर ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरलं जातं. गरीब लोकांना याद्वारे केंद्र सरकार धान्यही देत असतं.

कुटुंबप्रमुखाच्या नावानं रेशनकार्ड दिलं जात

रेशन कार्ड कुटुंबप्रमुखाच्या नावानं दिली जातं, ज्यात कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं असतात. कुटुंबात मूल जन्माला आल्यास किंवा सदस्याच्या लग्नानंतर रेशन कार्डावर नाव जोडलं जाऊ शकतं.

ऑनलाइन, ऑफलाइन प्रकारे नाव जोडतात

रेशन कार्डावर नवीन सदस्याचं नाव ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे जोडता येईल. त्यासाठी नव्या सदस्यांची काही महत्त्वाची कागदपत्रं आवश्यक असतात. कुटुंबात मूल जन्माला आल्यास त्याचा जन्म दाखला आवश्यक असून लग्न झाल्यास लग्नाचं सर्टिफिकेट आशव्यक असतं. यासोबतच अर्जासोबत प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड आणि फोटोही जोडावा लागतो.

फॉर्म ३ भरावा लागेल

शिधापत्रिकेत नवीन सदस्याचं नाव जोडण्यासाठी फॉर्म ३ भरावा लागेल. अन्न विभागाच्या वेबसाईटवरून हा फॉर्म डाऊनलोड करता येऊ शकतो. फॉर्म भरून सर्व कागदपत्रं जोडल्यानंतर तो थेट अन्न विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करता येतो. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊनदेखील फॉर्म देऊ शकता.

किती वेळ लागेल?

रेशन कार्डावर नवीन सदस्याचं नाव जोडण्यासाठी सादर केलेला अर्ज व सर्व कागदपत्रांची तपासणी करून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नव्या सदस्याचं नाव जोडलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेला १५ ते ३० दिवस लागू शकतात.

Web Title: In how many days it will take to add new members name in ration card Read the full details you may need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार