Join us  

आयकर पोर्टलच्या त्रुटीमुळे २५ हजार रुपयांचा फटका; एकूण करपात्र उत्पन्न मोजताना चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 6:45 AM

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ नुसार करदात्यांनी नवी कर व्यवस्थेचा पर्याय स्वीकारल्यास ७ लाख रुपयांच्या आत करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना २५ हजारांची सूट मिळते. त

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: आयकर विभागाच्या पोर्टलमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांमुळे करदात्यांना सुमारे २५ हजार रुपयांचा फटका बसत असल्याची बाब समोर आली आहे. अल्पकालीन भांडवली लाभ घेणाऱ्या करदात्यांना हा फटका बसत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ नुसार करदात्यांनी नवी कर व्यवस्थेचा पर्याय स्वीकारल्यास ७ लाख रुपयांच्या आत करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना २५ हजारांची सूट मिळते. तथापि, आयकर पोर्टल 'एकूण करपात्र उत्पन्न' मोजताना चूक करीत आहे, असे दिसून आले आहे. पोर्टलमधील यंत्रणा या गणनेत चुकून 'अल्पकालीन भांडवली लाभ' जोडत आहे. त्यामुळे 'एसटीसीजी 'वाल्या लोकांची सूटच रद्द झाली.दोष तत्काळ दूर करासूत्रांनी सांगितले की, पोर्टलमधील गणना पद्धतीमुळे अनेक करदात्यांना पात्र असूनही कर सवलत गमवावी लागू शकते. पोर्टलमधील त्रुटीमुळे जे करदाते सवलतीचा दावा करू शकत नाहीत, त्यांना वर्षाच्या शेवटी नोटीस मिळू शकते. कर तज्ज्ञांनी सांगितले की, आयकर विभागाने ही त्रुटी दूर करून पात्र करदात्यांना सूट मिळण्याची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्यायला हवी.

उत्पन्न ७ लाखांपेक्षा कमी असतानाही त्यांना २५ हजार रुपयांची कर सवलत मिळत नाही. ज्यांनी ५ जुलै २०२४ च्या आधी आयकर विवरणपत्रे दाखल केली आहेत. त्यांना ही सूट मिळाली आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्स