Join us

ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टोतून सरकारची बक्कळ कमाई, TDS च्या रुपात मिळाले ७०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 2:45 PM

देशात सध्या ऑनलाइन गेमिंगचं क्रेझ वाढत आहे. सध्या लोकांची ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातूनही कमाई होत आहे.

देशात सध्या ऑनलाइन गेमिंगचं क्रेझ वाढत आहे. सध्या लोकांची ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातूनही कमाई होत आहे. तर क्रिप्टोच्या माध्यमातूनही अनेकांनी पैसा कमावलाय. याच दरम्यान, यासंदर्भात सरकारनं काही नवे नियमही आणले. याचा परिणाम आता दिसून येत आहे. यामुळे सरकारी खजान्यात मोठी वाढ झालीये. ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टोवरील टीडीएसच्या माध्यमातून सरकारला कोट्यवधी रुपये मिळालेत. जाणून घेऊ याबाबत.ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टो व्यवसायासाठी सरकारनं नवीन टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (TDS) प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीअंतर्गत सरकारला कोट्यवधी रुपयांचा नफा झालाय. नवीन टीडीएस प्रणाली लागू झाल्यानंतर, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर जमा झालाय. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.टीडीएसचं कलेक्शनऑनलाइन गेमिंग व्यवस्था लागू झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षादरम्यान यामुळे ६०० कोटी रुपयांचा टॅक्स जमा करण्यात आलाय. तर क्रिप्टो व्यवसायातून जवळपास १०५ कोटी रुपयांचा टॅक्स मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही व्यक्तीनं जिंकलेल्या रकमेवर आता टीडीएस कापणं अनिवार्य करण्यात आलंय.टॅक्स लागू१ एप्रिल २०२२ पासून व्हर्च्युअल डिजिटल संपत्ती किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे होणाऱ्या व्यवसायावरून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागू करण्यात आलाय.

टॅग्स :इन्कम टॅक्सक्रिप्टोकरन्सी