Lokmat Money >आयकर > वर्षाअखेरिस आयकर विभागाचा नवा विक्रम, ८ कोटी ITR चा आकडा पार, करदात्यांचे मानले आभार

वर्षाअखेरिस आयकर विभागाचा नवा विक्रम, ८ कोटी ITR चा आकडा पार, करदात्यांचे मानले आभार

वर्षाअखेरिस आयकर विभागानं एक नवा विक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 03:37 PM2023-12-30T15:37:37+5:302023-12-30T15:40:23+5:30

वर्षाअखेरिस आयकर विभागानं एक नवा विक्रम केला आहे.

A new record of Income Tax department at the end of the year crossing the mark of 8 crore ITR shares x post | वर्षाअखेरिस आयकर विभागाचा नवा विक्रम, ८ कोटी ITR चा आकडा पार, करदात्यांचे मानले आभार

वर्षाअखेरिस आयकर विभागाचा नवा विक्रम, ८ कोटी ITR चा आकडा पार, करदात्यांचे मानले आभार

वर्षाअखेरिस आयकर विभागानं एक नवा विक्रम केला आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार असेसमेंट ईयर २०२३-२४ साठी आतापर्यंत ८ कोटीहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) जमा करण्यात आले आहेत. यापूर्वी, करदात्यांनी असेसमेंट ईयर २०२२-२३ साठी एकूण ७,५१,६०,८१७ आयटीआर सादर केले होते. म्हणजेच, संपूर्ण गेल्या असेसमेंट ईयरमध्ये (२०२२-२३) भरलेल्या आयटीआरच्या संख्येपेक्षा यंदा अधिक आयटीआर वर्ष संपण्याच्या ३ महिने आधीच दाखल झाले आहेत.

आयकर विभागानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. "आयकर विभागासाठी हा एक मैलाचा दगड आहे! असेसमेंट ईयर २०२३-२४ साठी आतापर्यंत आठ कोटींहून अधिक आयटीआर दाखल केले गेले आहेत. इथपर्यंत आम्ही प्रथमच पोहोचलो आहेत. असेसमेंट ईयर २०२२-२३ साठी एकूण ७,५१,६०,८१७ आयटीआर दाखल करण्यात आले होते. आम्हाला ८ कोटींचा आकडा गाठण्यात मदत केल्याबद्दल आयकर विभाग सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार मानतो," असं त्यांनी नमूद केलंय.



आयकर विभागाचा हा रेकॉर्ड मागील असेसमेंट ईयरच्या तुलनेत आयटीआर फाइलिंगमध्ये ६.४४ टक्क्यांची वाढ दर्शवितो. गेल्या वर्षीची तुलना केल्यास, ३१ ऑक्टोबरपर्यंत आयकर विभागाकडे ७.६५ कोटी आयटीआर दाखल झाले होते, जे गेल्या वर्षीच्या ७.५१ कोटी आयटीआरपेक्षा जास्त आहे.

Web Title: A new record of Income Tax department at the end of the year crossing the mark of 8 crore ITR shares x post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.