Lokmat Money >आयकर > तुम्ही केवळ TAX वाचवण्यासाठी तर गुंतवणूक करत नाही ना? समजून घ्या याचं नुकसान

तुम्ही केवळ TAX वाचवण्यासाठी तर गुंतवणूक करत नाही ना? समजून घ्या याचं नुकसान

प्रत्येक जण आपल्या कमाईतील काही ना काही भाग वाचवून गुंतवणूक (Investment) करत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 02:51 PM2023-06-26T14:51:36+5:302023-06-26T14:52:40+5:30

प्रत्येक जण आपल्या कमाईतील काही ना काही भाग वाचवून गुंतवणूक (Investment) करत असतो.

Aren t you investing just to save TAX Understand the pitfalls of this know details tax saving schemes | तुम्ही केवळ TAX वाचवण्यासाठी तर गुंतवणूक करत नाही ना? समजून घ्या याचं नुकसान

तुम्ही केवळ TAX वाचवण्यासाठी तर गुंतवणूक करत नाही ना? समजून घ्या याचं नुकसान

प्रत्येक जण आपल्या कमाईतील काही ना काही भाग वाचवून गुंतवणूक (Investment) करत असतो. ही गुंतवणूक निरनिराळी असू शकते. एफडीमध्ये, म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि इन्शूरन्स (Insurance), इक्विटीसारखे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. काही लोक टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करतात, तर काही लोक बचतीसाठी गुंतवणूक करतात. जर तुम्ही केवळ टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला याचं नुकसानही जाणून घेणं आवश्यक आहे.

आपण आज टॅक्स सेव्हिंग स्कीम्समधील त्या त्रुटींबद्दल जाणून घेऊ ज्या तुम्हाला माहित असणं महत्त्वाचं आहे. टॅक्स सेव्हिंग फायनॅन्शिअल प्लॅनिंगचाय महत्त्वाचा भाग नक्कीच आहे, परंतु कोणत्याही गुंतवणूकीचं पहिलं ध्येय लक्ष्यापर्यंत पोहोचणं असलं पाहिजे. केवळ टॅक्स सेव्हिंगसाठी केलेल्या गुंतवणूकीतून तुम्हाला फायनॅन्शिअल टार्गेट गाठणं कठीण होऊ शकतं.

गुंतवणूकीचा उद्देश
तुम्ही कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करा, परंतु त्यापूर्वी गुंतवणूक का करायची आहे हे समजून घ्या. गुंतवणूकीचा उद्देश काय आहे? टॅक्स वाचवणं किंवा बचतीच्या पैशांना वाढवणं किंवा कठीण काळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी मिळणाऱ्या इन्शूरन्स कव्हरची ध्येय निराळी आहेत. निरनिराळ्या टार्गेटसाठी निरनिराळी गुंतवणूक केली पाहिजे.

अटींसह टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रूमेंट
कर वाचवण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. पण फक्त कर वाचवण्यासाठी गुंतवणूक केल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. फक्त कर बचत योजनांवर लक्ष केंद्रित करून, तुम्ही कर वाचवू शकता, परंतु तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही. याच्या तोट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, कर बचतीच्या तीन त्रुटींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही फक्त कर बचत करण्याच्या उद्देशानं कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करत असल्यास, तुम्ही गुंतवणुकीसाठी निवडलेलं साधन किंवा योजना अनेक अटी आणि लॉक-इन कालावधीसह येतं.

टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही जास्तीतजास्त १.५ लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला वार्षिक १.५ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे टॅक्स सेव्हिंगचे अधिक पर्याय नाहीत. अशात गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमी रिटर्न मिळतात. तर टॅक्स सेव्हिंग स्कीम्सच्या गुंतवणूकदारांना बाजारातील वाढीचाही फायदा मिळत नाही.

टॅक्स सेव्हिंग स्कीम
प्रसिद्ध टॅक्स सेव्हिंग स्कीम्सबाबत सांगायचं झालं तर यात पब्लिक प्रोविडेंड फंड म्हणजेच पीपीएफ, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, आणि एफडी स्कीमसारख्या योजनांचा समावेश आहे. जर तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी स्कीम घेत असाल कर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रूमेंटसह सेव्हिंग किंवा म्युच्युअल फंड, डेट फंड, शेअर, गोल्ड बॉन्ड, एफडी आणि लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Aren t you investing just to save TAX Understand the pitfalls of this know details tax saving schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.