Lokmat Money >आयकर > सेन्सेक्समध्ये ५५५ अंकांची मोठी उसळी; पॉवर सेक्टरमधील शेअर्स चमकले, BHELमध्ये वाढ

सेन्सेक्समध्ये ५५५ अंकांची मोठी उसळी; पॉवर सेक्टरमधील शेअर्स चमकले, BHELमध्ये वाढ

मेटल आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीमुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या उसळीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:32 PM2023-09-01T16:32:32+5:302023-09-01T16:32:54+5:30

मेटल आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीमुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या उसळीसह बंद झाले.

Big jump in Sensex by 555 points Power sector shares shine BHEL gains jio financial hike | सेन्सेक्समध्ये ५५५ अंकांची मोठी उसळी; पॉवर सेक्टरमधील शेअर्स चमकले, BHELमध्ये वाढ

सेन्सेक्समध्ये ५५५ अंकांची मोठी उसळी; पॉवर सेक्टरमधील शेअर्स चमकले, BHELमध्ये वाढ

मेटल आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीमुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या उसळीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 555.75 अंकांच्या म्हणजेच 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 65,387.16 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 181.50 अंकांच्या म्हणजेच 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 19,435.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, भेलचा शेअर ११ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. एनटीपीसी (NTPC) आणि जिओ फायनान्शिअलचे (Jio Financial) शेअर्स निफ्टीवर 1-1 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले.

फार्मा वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. पॉवर, मेटल, ऑटो, ऑईल अँड गॅस आणि बँक निर्देशांकात 1-2.7 टक्क्यांची उसळी दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.7-0.7 टक्क्यांची वाढ दिसून आली.

या शेअर्समध्ये वाढ
बीएसई सेन्सेक्सवर एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक 4.84 टक्क्यांनी वाढून बंद झाले. त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, मारुती आणि पॉवरग्रीडचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय इंडसइंड बँक, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्सचे शेअर्स प्रत्येकी दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. विप्रो, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एसबीआय, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

हे शेअर्स आपटले
अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, लार्सन अँड टुब्रो आणि सन फार्मा यांचे शेअर्स सेन्सेक्सवर आज घसरणीसह बंद झाले.

Web Title: Big jump in Sensex by 555 points Power sector shares shine BHEL gains jio financial hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.