Lokmat Money >आयकर > PAN-Aadhaar link बाबत मोठी अपडेट, घर खरेदीदरम्यानही येऊ शकते समस्या; जाणून घ्या

PAN-Aadhaar link बाबत मोठी अपडेट, घर खरेदीदरम्यानही येऊ शकते समस्या; जाणून घ्या

जर पॅन आधार लिंक नसेल तर आता घर खरेदी करणाऱ्यांना काही समस्यांना समोरं जावं लागू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:52 AM2023-12-07T10:52:19+5:302023-12-07T10:53:07+5:30

जर पॅन आधार लिंक नसेल तर आता घर खरेदी करणाऱ्यांना काही समस्यांना समोरं जावं लागू शकतं.

Big update regarding PAN Aadhaar link problem may occur even during property purchase tds income tax know details | PAN-Aadhaar link बाबत मोठी अपडेट, घर खरेदीदरम्यानही येऊ शकते समस्या; जाणून घ्या

PAN-Aadhaar link बाबत मोठी अपडेट, घर खरेदीदरम्यानही येऊ शकते समस्या; जाणून घ्या

PAN-Aadhaar Link: आता घर खरेदी करणाऱ्यांना काही समस्यांना समोरं जावं लागू शकतं. तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही टॅक्सही भरावा लागतो. विशेषत: शुल्क टीडीएसच्या स्वरूपात भरावे लागतं. पण, जर पॅन-आधार लिंक नसेल, तर नवीन आयकर नियमांनुसार, तुम्हाला मोठा कर भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप पॅन-आधार लिंक (PAN-Aadhaar Link) केलं नसेल, तर घर खरेदी करणे कठीण होऊ शकतं.

...तर २० टक्के टीडीएस
तुम्ही ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर १ टक्का टीडीएस भरावा लागेल. यामध्ये खरेदीदाराला १ टक्का टीडीएस केंद्र सरकारला आणि ९९ टक्के रक्कम विक्रेत्याला द्यावी लागते. पण, जर पॅन-आधार लिंक नसेल तर खरेदीदाराला १ टीडीएस ऐवजी २० टक्के टीडीएस भरावा लागेल. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून, मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. ५० लाखांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना विभागाकडून नोटीस पाठवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?
आयकर कायद्याच्या कलम १३९ एएच्या तरतुदीनुसार, इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आधार लिंक करणे अनिवार्य आहे. पण, विभागाला अशी अनेक प्रकरणं आढळून आली आहेत जिथे पॅन-आधार लिंक करण्यात आलेलं नाही. अशा शेकडो घर खरेदीदारांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ होती. या मुदतीपर्यंत आधार लिंक मोफत करता येणार होतं. पण, ज्यांनी पॅन-आधार लिंक केलेलं नाही त्यांना अनेक आघाड्यांवर जास्त करांचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या व्यवस्थेत पॅन-आधार लिंकिंगही करता येते. मात्र, यासाठी १००० रुपये विलंब शुल्क भरूनच ते लिंक करता येतं.

Web Title: Big update regarding PAN Aadhaar link problem may occur even during property purchase tds income tax know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.