Join us  

Budget 2024 : कॅपिटल गेनबाबत बदलला नियम; ₹१.२५ लाखापर्यंतच्या नफ्यावर LTCG टॅक्स नाही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 2:01 PM

Budget Capital Gains Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना कॅपिटल गेन टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली.

Budget Capital Gains Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना कॅपिटल गेन टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली. अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या फायनान्शिअल असेट्सवरील लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) कर १० टक्क्यांवरून १२.५ टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडक मालमत्तेवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (एसटीसीजी) कर आता २० टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. तसंच निवडक असेटवरील लाँग टर्म कॅपिटल गेनवरील सवलतीची मर्यादा ही एक लाख रुपयांवरून सव्वा लाख रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ आणि मध्यमवर्गाला अधिक दिलासा देण्याच्या हेतूनं एलटीसीजी कर सवलतीची मर्यादा वाढविण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा -  इन्कम टॅक्समध्ये मोठ्या बदलांची घोषणा; पण 'यांना' मिळणार नाही फायदा

लिस्टेड फायनान्शिअल असेट्स एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ठेवल्यास ती दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाईल, असंही अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री म्हणाल्या. त्याचबरोबर अनलिस्टेड फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल अॅसेट्स २ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ठेवल्यास ती दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाईल. दरम्यान, होल्डिंग पीरियडचा हा नियम बाँड्स, डिबेंचर्स किंवा डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर लागू होणार नाही आणि करदात्याच्या टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जाईल.यापुढे काही वित्तीय मालमत्तेच्या शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर २० टक्के कर आकारला जाईल. त्याचबरोबर इतर सर्व वित्तीय मालमत्ता आणि सर्व बिगर वित्तीय मालमत्तेवरील कराचा दर कर स्लॅबनुसार लागू होईल," असं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं.

...तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन

कॅपिटल गेनवर आता जास्तीत जास्त १० ते ३० टक्के दरानं कर आकारला जातो. कराचा दर त्याच्या होल्डिंग कालावधीवर अवलंबून असतो. साधारणपणे युजर्सनं शेअर्स किंवा इतर कोणत्याही आर्थिक मालमत्तेत एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली असेल तर त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. त्याचबरोबर होल्डिंग पीरियड एक वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.

हेही वाचा - शहरातील नागरिकांसाठी खूशखबर; १ कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा

जर तुम्ही एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत इक्विटी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री केली तर तुमच्याकडून १५ टक्के दरानं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर आकारला जाईल.

टॅग्स :करअर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019