Join us

...तर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा कमी असले तरी भरावा लागेल टॅक्स; काय आहे नवीन नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 11:14 IST

Tax on Capital Gain : तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी उत्पन्नाचा कोणताही भाग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनमधून आला असेल, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.

No Rebate On Special Rate Income : केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे. तुम्हालाही हे खरं वाटत असेल तर तुमची फसवणूक होऊ शकते. कारण आयकराचे कलम ८७A अंतर्गत १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले आहे. ते विशेष दराच्या उत्पन्नावर लागू होत नाही. लॉटरी किंवा इक्विटीमधून मिळणारी कमाई ही विशेष दर उत्पन्नाच्या अंतर्गत येते. याशिवाय शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेनही या अंतर्गत येतात. त्यामुळे तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी उत्पन्नाचा कोणताही भाग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनमधून आला असेल, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.

१२ लाखांच्या आत असलेल्या उत्पन्नावरही कर लागणारसमजा तुमचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे. पण, लॉटरीतून तुम्हाला ३ लाख ५० हजार रुपयांचा नफा झाला, तर तुमचा आयकर शून्य होणार नाही. साडेतीन लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के दराने कर भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला ३५ हजार रुपये आयकर विभागाला भरावे लागतील. त्याचप्रमाणे, इतर अल्पकालीन आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलातही, उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असले तरीही कर भरावा लागेल. अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली नफ्यांची कर गणना अनुक्रमे कलम १११A आणि कलम ११२ अंतर्गत केली जाते. कलम ८७A च्या तरतुदी त्यांना लागू होत नाहीत.

अर्थसंकल्पातील ८७ अ ची सवलत कशी मिळतेनवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असण्याची तांत्रिक बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे. आयकर कायद्याच्या कलम ८७ ए अंतर्गत, ४ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर शून्य आहे. ४ ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नाच्या स्लॅबवर ५ टक्के कर लावला जातो, जो २० हजार रुपयांपर्यंत असेल. त्याचप्रमाणे ८ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नाच्या स्लॅबवर १० टक्के दराने एकूण ६० हजार रुपयांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो. यावेळी अर्थसंकल्पात कलम ८७-अ अंतर्गत ६० हजार रुपयांपर्यंतच्या करावर सूट देण्यात आली आहे. अशाप्रकारे १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले आहे. परंतु, कलम ८७ A अंतर्गत अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर किंवा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर ही कर सवलत मिळणार नाही.

टॅग्स :अर्थसंकल्प २०२५इन्कम टॅक्सआयकर मर्यादानिर्मला सीतारामन