buying luxury goods : जर तुम्हालाही लक्झरी बॅग्ज, घड्याळे किंवा चष्मा, शूजची हौस असेल तर ही बातमी तुम्हाला धक्का देऊ शकते. कारण, या वस्तू खरेदी करण्यासाठी तुमचा खिसा आता जास्त रिकामा करावा लागणार आहे. तुम्हाला या वस्तू एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त खरेदी करण्यासाठी कर भरावा लागू शकतो. १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग्ज, मनगटी घड्याळे, पादत्राणे आणि स्पोर्ट्सवेअर (खेळातील उत्पादने) यासारख्या लक्झरी वस्तूंवर आता एक टक्का टीसीएस आकारला जाणार आहे. आता तुम्ही म्हणला जीएसटी ऐकलं होतं, हे टीसीएस काय प्रकार आहे?
सध्या, १ जानेवारी २०२५ पासून १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोटार वाहनांवर एक टक्का दराने टीसीएस आकारला जात आहे. प्राप्तिकर विभागाने २२ एप्रिल २०२५ पासून १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विशिष्ट लक्झरी वस्तूंच्या विक्रीवर एक टक्का टीसीएस लावण्याची अधिसूचना जारी केली आहे.
टीसीएस कसे काम करते?
विशिष्ट वस्तूंच्या विक्रीच्या वेळी खरेदीदाराकडून टीसीएस वसूल केला जातो. प्राप्तीकर परतावा भरताना खरेदीदाराच्या कर दायित्वामध्ये त्याचा समावेश केला जातो. स्रोतावर कर कपात केल्याने कोणताही अतिरिक्त महसूल मिळत नाही. परंतु, खरेदीच्या वेळी पॅन तपशील सादर करावा लागत असल्याने उच्च मूल्याच्या खर्चाचा मागोवा घेण्यास कर विभागाला मदत होते. १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तू आणि मोटार वाहनांसाठी टीसीएसची तरतूद जुलै २०२४ मध्ये अर्थसंकल्पात वित्त कायदा, २०२४ द्वारे सादर करण्यात आली.
📢CBDT Notification Alert!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) April 23, 2025
➡️New rules issued for Tax Collection at Source (TCS) on the purchase of certain goods.
✅Notification S.O. 1825(E) dated 22.04.2025 published in https://t.co/wgrnm5QBDw
🔗The Notification can be accessed at:https://t.co/6GAXN2t5RSpic.twitter.com/zoRIH6NkXd
या वस्तूंवर कर आकारला जाईल
- लक्झरी मनगट घड्याळ
- चित्रे आणि शिल्पे यासारख्या प्राचीन वस्तू
- नाणी, तिकिटे इत्यादी संग्रहणीय वस्तू.
- लक्झरी नौका, रोइंग बोटी, कॅनो, हेलिकॉप्टर
- लक्झरी सनग्लासेस
- लक्झरी हँडबॅग्ज, वॉलेट्स
- लक्झरी शूज
- गोल्फ किट्स, स्की वेअर यांसारख्या क्रीडा साहित्य
- होम थिएटर सिस्टम
- पोलो किंवा रेस क्लबसाठी घोडे खरेदी करणे
वाचा - ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
किती रकमेवर टॅक्स भरावा लागतो?
सीबीडीटीने एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केलेली रक्कम १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच त्यावर टीसीएस आकारला जाईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही रिचर्ड मिल किंवा १० लाख रुपयांचे कोणतेही लक्झरी घड्याळ खरेदी केले तर दुकानदार ग्राहकाकडून १ टक्के टीसीएस आकारेल.