Lokmat Money >आयकर > मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:20 AM2023-08-01T08:20:09+5:302023-08-01T08:21:20+5:30

विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल. 

Deadline ends 6.5 crore people file ITR Late fees to be paid now | मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

नवी दिल्ली : २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण (आयटीआर) दाखल करण्याची मुदत संपली. अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ६.७ काेटी आयटीआर दाखल झाले. शेवटच्या दिवशीच सुमारे ५० लाख लाेकांनी विवरण दाखल केले. आयटीआरसाठी काही दिवसांची मुदतवाढीची मागणी केली जात हाेती. मात्र, तसे झाले नाही. मुदतीनंतर दाखल करणाऱ्यांना १ ते १० हजार रुपयांपर्यंत विलंब शुल्क द्यावे लागेल. ३१ जुलैला सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३७ लाख आयटीआर दाखल झाले हाेते. 

पुढे काय?
विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल. 
...तर रवानगी तुरुंगात
३१ डिसेंबरपर्यंत विवरण दाखल न करणाऱ्यांवर आयकर विभाग खटला दाखल करू शकते. त्यांना सहा महिने ते सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. उशिरा विवरण दाखल करणाऱ्यांची सखाेल तपासणी होऊ शकते. 

Web Title: Deadline ends 6.5 crore people file ITR Late fees to be paid now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.