Lokmat Money >आयकर > डिसेंबरमध्ये ITR, आधार, क्रेडिट कार्डसारख्या अनेक कामांची शेवटची तारीख, RBI बैठकीवरही लक्ष

डिसेंबरमध्ये ITR, आधार, क्रेडिट कार्डसारख्या अनेक कामांची शेवटची तारीख, RBI बैठकीवरही लक्ष

December Financial Change: वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरू होण्यासाठी फक्त एकच दिवस उरला असून या महिन्यात अनेक महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:29 PM2024-11-29T15:29:29+5:302024-11-29T15:32:35+5:30

December Financial Change: वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरू होण्यासाठी फक्त एकच दिवस उरला असून या महिन्यात अनेक महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत येत आहे.

december financial change including rbi credit policy advance tax filing aadhaar credit card change last date | डिसेंबरमध्ये ITR, आधार, क्रेडिट कार्डसारख्या अनेक कामांची शेवटची तारीख, RBI बैठकीवरही लक्ष

डिसेंबरमध्ये ITR, आधार, क्रेडिट कार्डसारख्या अनेक कामांची शेवटची तारीख, RBI बैठकीवरही लक्ष

December Financial Change : डिसेंबर महिना जवळ येत असून २०२४ हे वर्ष लवकरच संपणार आहे. दरम्यान, डिसेंबर वर्षाचा शेवटचा महिना अनेक आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. सर्वात मोठी घडामोड म्हणजे रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. यात व्याजदर कमी करण्याची सर्वसामान्यांची आशा आहे. दुसरीकडे मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारखही याच महिन्यातील आहे. तर उशीरा कर रिटर्न भरणाऱ्यांसाठी आगाऊ कर भरण्याची अंतिम तारीख देखील महत्त्वाची आहे. त्याचबरोबर काही बँकांच्या क्रेडिट कार्डच्या शुल्कातही बदल होताना दिसत आहेत.

RBI की क्रेडिट पॉलिसी 6 दिसंबर को आएगी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ६ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या आर्थिक धोरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर कमी करण्याची मागणी खुद्द अर्थमंत्र्यांनीच केली होती. त्यामुळे आरबीआय यावेळी तरी दर कमी करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महागाई दर नियंत्रणात राहिल्यास आरबीआय धोरणात्मक दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. जर आरबीआयने ६ डिसेंबर रोजी आपली भूमिका बदलली नाही. तर तुमच्या गृहकर्जाचे व्याजदर आणि EMI मध्ये कोणतीही बदल होणार नाही.

आधारमध्ये मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) मोफत आधार अपडेट करण्यासाठी १४ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या आधारमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीखमध्ये कोणताही बदल कोणत्याही शुल्काशिवाय करू शकता. UIDAI ने दर १० वर्षांनी आधार अपडेट करण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून तुमच्या आधारमधील माहिती अद्ययावत राहील. जर तुम्ही हे अपडेट १४ डिसेंबरनंतर पूर्ण केले तर तुम्हाला प्रति नवीन बदलासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल.

कर हप्त्याची शेवटची तारीख
जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि ठेवींवरील व्याज, भाड्याचे उत्पन्न, भांडवली नफा किंवा इतर कोणत्याही स्रोतातून उत्पन्न मिळवत असाल तर तुम्हाला आगाऊ कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम २०८ अंतर्गत, आर्थिक वर्षात TDS आणि TCS कापल्यानंतर कर दायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास, आगाऊ कर भरावा लागतो. करदात्यांनी त्यांचे अंदाजे कर दायित्व चार हप्त्यांमध्ये भरायचे आहे. त्यातील ७५ टक्के रक्कम १५ डिसेंबरपर्यंत भरणे आवश्यक आहे. विलंबाने भरलेल्या किंवा न भरलेल्या करावर कलम २३४C अंतर्गत दरमहा १ टक्के दराने दंडात्मक व्याज आकारले जाईल.

Axis Bank क्रेडिट कार्ड शुल्कात बदल होणार
Axis Bank क्रेडिट कार्डच्या सहयोगी शुल्कांमध्ये सुधारणा करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर आहे. या अंतर्गत, ग्राहकांकडून नवीन रिडेम्पशन फी, क्रेडिट कार्डचे व्याज दर आणि इतर अनेक व्यवहारांवर बदललेले शुल्क आकारले जाईल. Axis Bank ने EDGE Rewards आणि माइल्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी शुल्क बदलले आहे. आता प्रत्येक रोख रिडेम्पशनवर रुपये १९९ अधिक GST भरावा लागणार आहे. तर पॉइंट्सचे मायलेज प्रोग्राममध्ये रूपांतर केल्यास १९९ रुपये अधिक GST आकारला जाईल. 

उशीरा टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर
जर तुम्ही अद्याप तुमचे आयकर रिटर्न भरले नसेल, तर तुम्ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत उशिराने किंवा सुधारित कर रिटर्न भरू शकता. वास्तविक, ITR भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ होती. परंतु, तुम्ही तुमचे सुधारित उशीरा विवरणपत्र ५००० रुपयांच्या दंडासह दाखल करू शकता. ज्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना १००० रुपये दंड आहे. टॅक्स रिटर्न भरण्यासोबतच २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी काही शिल्लक राहिल्यास थकबाकीदार करही भरावा लागेल. त्यावर व्याजही भरावे लागणार आहे.

Web Title: december financial change including rbi credit policy advance tax filing aadhaar credit card change last date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.