Online Gaming Sites Blocked : ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तर दुसरीकडे या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचे प्रकारही होत आहे. तुम्ही ऑनलाईन गेम खेळत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. करचोरी रोखण्यासाठी सरकारने ऑनलाइन गेमिंगवर मोठी कारवाई केली आहे. जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांनी परदेशातून कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या ३५७ वेबसाइट्स/URL तसेच सुमारे २४०० बँक खाती ब्लॉक केली आहेत. एवढेच नाही तर सुमारे १२६ कोटी रुपयेही गोठवले आहेत.
आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे उघडअर्थ मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, डीजीजीआयच्या तपासणीत ई-गेमिंग सेगमेंटमध्ये ७०० विदेशी ऑपरेटर आहेत. या गेमिंग कंपन्या जीएसटी नोंदणी न करून कर चुकवत असल्याचे डीजीजीआयला तपासात आढळून आले आहे. यासोबतच DGGI अधिकाऱ्यांनी देशाबाहेर ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या काही भारतीय नागरिकांवरही कारवाई केली आहे.
आतापर्यंत ३ जणांना अटकतपासात समोर आलेल्या खुलाशानुसार, हे लोक सतगुरु ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म, महाकाल ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म आणि अभी २४७ ऑनलाइन सारख्या अनेक ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील लोकांना ऑनलाइन गेमिंग सुविधा पुरवत आहेत. गेमिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी म्यूल बँक खात्यांचा वापर करत असल्याचेही समोर आले.
म्यूल बँक म्हणजे एक असे बँक खाते, जे गुन्हेगारांकडून बेकायदेशीरपणे मिळवलेले पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते. या खात्याचा मालक गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. उदा. गुन्हेगार बनावट नोकरीच्या ऑफर किंवा आकर्षक ऑफर देऊन लोकांना फसवतात. या लोकांना त्यांचे बँक खाते तपशील किंवा डेबिट कार्ड तपशील देण्यास सांगितले जाते. गुन्हेगार चोरी केलेले पैसे या खात्यांमध्ये हस्तांतरित करतात. खाते मालकांना हे पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारात गुन्हेगार पकडला जाण्याची शक्यता कमी असते.
मोठमोठे स्टार्स करतात प्रमोशनमंत्रालयाने म्हटले आहे की अनेक बॉलीवूड तारे, क्रिकेटपटू, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अशा प्लॅटफॉर्मचा प्रचार करतात. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ऑफशोअर ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये सामील होण्याचे टाळण्याचा सल्ला दिला आहे.