सर्व करदात्यांनी दरवर्षी आयकर रिटर्न भरणे गरजेचे असते. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा हे अनेकांना माहिती नसते. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू.
कर बचत योजनेत गुंतवणूक करा
सरकार आयकर कलम ८० सी अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत देते. या योजनांमध्ये तुमची बचत गुंतवून तुम्ही कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस), नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) यामध्ये गुंतवणूक करून कर बचत करता येते.
आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करा
- नवीन वर्षात कर बचतीसाठी तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना खरेदी करू शकता.
असे केल्याने तुम्ही कलम ८० डी अंतर्गत विमा योजनेसाठी प्रीमियम भरण्यासाठी २५,००० रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता.
- ज्येष्ठ नागरिक आयकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत ५०,००० पर्यंत कर सवलत मागू शकतात. तुम्ही तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी करता तेव्हाही तुम्ही ५०,००० रुपयांचा अतिरिक्त कर वाचवू शकता.
गृहकर्जावर कर बचतीचा लाभ घ्या
तुम्ही बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घेतले असल्यास तुम्ही नियमांनुसार तुमच्या कर्जावरील व्याज आणि कर्जाच्या रकमेवर कर कपातीचा दावा करण्यास पात्र आहात. आयकराच्या कलम २४ अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावर जास्तीत जास्त २ लाख रुपयांची कर कपात उपलब्ध आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"