Join us

ITR दाखल करण्याच्या या तारखांकडे दुर्लक्ष करू नका, विसरलात तर बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 3:42 PM

या तारखा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Income Tax Return: सध्या देशभरात आयटीआर भरण्याची लगबग सुरू आहे. आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. ज्या करदात्यांचं 2023-24  असेसमेंट इयरसाठी ऑडिट होत नाही, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. देशातील विविध प्रकारच्या करदात्यांसाठी ITR दाखल करण्याच्या अंतिम तारखा निरनिराळ्या आहेत. आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ.

लोकांना त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ठरलेल्या तारखेपर्यंत भरणं आवश्यक आहे. जर कोणीही निश्चित तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर दंडही आकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, विलंब शुल्क किंवा दंड टाळण्यासाठी सर्व करदात्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे आयटीआर फाइल करणं आवश्यक आहे.कोणत्या आहेत तारखा?

  • ते करदाते ज्यांच्या खात्यांचं ऑडिट झालेलं नाही, त्यांच्यासाठी रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै २०२३ आहे.
  • ज्या करदात्यांना ट्रान्सफर प्रायसिंग ऑडिट रिपोर्ट फॉर्म भरणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी ही तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे.
  • टीपी ऑडिटच्या अधीन असलेल्या फर्ममधील भागीदार, ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
  • कोणत्याही फर्ममधील भागीदारांचे पती पत्ती टीपी ऑडिटच्या अधीन आहेत, त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. याशिवाय पती किंवा पत्नी कलम ५ए च्या अधीन आहे, तर ही तारीख ३० नोव्हेंबर २०२३ असेल.
  • ज्या कंपन्यांना टीपी ऑडिटची गरज नाही त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • आयकर नियमाच्या कोणत्याही अन्य कायद्यांतर्गत ऑडिट केलेली खाती, त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • ऑडिट करणाऱ्या फर्ममध्ये भागीदार, त्यांच्यासाठी आयटीआरसाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.
टॅग्स :इन्कम टॅक्ससरकार