Lokmat Money >आयकर > Tax on YouTube Earnings : YouTube वरून पैसे कमावले तर त्यावर किती टॅक्स भरावा लागतो? कशी असते कर रचना?

Tax on YouTube Earnings : YouTube वरून पैसे कमावले तर त्यावर किती टॅक्स भरावा लागतो? कशी असते कर रचना?

YouTube Creaters : आज आपल्या आसपास असंख्य यूट्यूबर्स पाहायला मिळतात. तुम्हीही कंटेन्ट क्रिएटर्स असाल तर तुम्हाला टॅक्स भरण्याची माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:54 AM2024-10-15T10:54:41+5:302024-10-15T10:55:19+5:30

YouTube Creaters : आज आपल्या आसपास असंख्य यूट्यूबर्स पाहायला मिळतात. तुम्हीही कंटेन्ट क्रिएटर्स असाल तर तुम्हाला टॅक्स भरण्याची माहिती आहे का?

earning from youtube then how much tax will you have to pay | Tax on YouTube Earnings : YouTube वरून पैसे कमावले तर त्यावर किती टॅक्स भरावा लागतो? कशी असते कर रचना?

Tax on YouTube Earnings : YouTube वरून पैसे कमावले तर त्यावर किती टॅक्स भरावा लागतो? कशी असते कर रचना?

YouTube Creaters : सोशल मीडियाचा झपाट्याने प्रसार होत असतानाच कंटेन्ट क्रिएटर्सची संख्याही त्याच पटीत वाढत आहे. आजच्या घडीला कंटेन्ट क्रिएटर्सची कमाईने कधीच कोटीचा आकडा ओलांडला आहे. देशात गावखेड्यापासून मेट्रो सिटीपर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रभाव पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत या कमाईवर सरकारलाही कर भरावा लागतो. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की YouTube मधून कमावलेल्या उत्पन्नावर ITR कोणत्या फॉर्ममध्ये दाखल केला जातो. तसेच, कर मोजणीचा नियम काय आहे?

टॅक्स आकारणीचा नियम काय?
देशात शेती सोडून कुठल्याही उत्पन्नावर कर आकारणीचे नियम सारखे आहेत. भारतात ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे. तसेच, जर तुम्ही आयटीआर भरताना जुनी कर व्यवस्था निवडली, तर ५ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त श्रेणीत येईल. तर नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कक्षेत येते. आयकर भरताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की नोकरदार वर्गाप्रमाणे, YouTube वरून मिळणारे उत्पन्न ITR-१ किंवा ITR-२ फॉर्म अंतर्गत दाखल करता येत नाही.

YouTuber साठी ITR कसा वेगळा आहे?
YouTuber म्हणून, तुमच्या कमाईवर पगारदार व्यक्तींप्रमाणे नाही तर फ्रीलान्सर किंवा व्यावसायिकांप्रमाणे कर आकारला जातो. त्यामुळे युट्यूबर्स ITR-१ किंवा ITR-२ फॉर्म वापरू शकत नाही. क्रिएटर्सचे उत्पन्न पगारदार वर्गात येत नसल्याने त्यांना स्टँडर्ड डिडक्शनसाठी ७५ हजारांचा दावाही करता येत नाही. अशा तुम्ही तुमच्या व्यावसायिक खर्चाच्या आधारे कर कपातीचा दावा करू शकता.

कोणता फॉर्म भरायचा?
YouTuber च्या कमाईला फ्रीलांसर किंवा व्यवसायासारखे मानले जाते असल्याने ते ITR-३ फॉर्म वापरू शकतात. जर तुम्ही अनुमानित कर आकारणी योजनेची निवड केली असेल, तर ITR-४ फॉर्म वापरावा. हा फॉर्म सोपा असून त्यासाठी बॅलन्सशीट किंवा तपशीलवार नफा आणि तोटा विवरणपत्र आवश्यक नाही. जर तुमचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला तोटा दाखवायचा असेल तर तुम्हाला ITR-३ फॉर्म वापरणे आवश्यक आहे.

YouTube वरून मिळकत तपशील
आयकर विभाग YouTubers द्वारे तयार केलेल्या कंटेन्टच्या स्वरूपावर आधारित त्यांच्या उत्पन्नाचे वर्गीकरण करतो. तुम्ही व्यावसायिक कंटेन्ट तयार केल्यास किंवा तुमचे चॅनल नोंदणीकृत व्यवसाय असल्यास, तुमचे उत्पन्न व्यवसाय उत्पन्न म्हणून वर्गीकृत केले जाते. जर तुम्ही फक्त मनोरंजनासाठी कंटेन्ट तयार करत असाल आणि त्यातून पैसे कमवत असाल, तर ते "इतर स्त्रोत" म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते.
 

Web Title: earning from youtube then how much tax will you have to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.