Join us

Electric Vehicle: इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीवर मिळते टॅक्समध्ये बंपर सूट, पाहा कसा मिळवाल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:59 PM

इलेक्ट्रीक वाहनांवर तुम्ही केवळ पेट्रोल डिझेलचाच खर्च नाही तर, टॅक्समध्येही फायदा मिळवू शकता.

जर तुम्ही इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. इलेक्ट्रीक कार किंवा स्कूटर खरेदी केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यामुळे कधीही अशा प्रकारची स्मार्ट खरेदी करणे चांगले. केंद्रीय अर्थसंकल्प 2019 नुसार, सरकारने इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीसाठी कर सवलत जाहीर केली होती. सर्व नोंदणीकृत वाहने या योजनेंतर्गत येतात, असेही सरकारने म्हटले आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीला आयकर कलम 80EEB अंतर्गत सूट देण्यात आली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि कच्च्या तेलावर खर्च होणारे अब्जावधी रूपयांवर लगाम घालण्यासाठी सरकारकडे पर्याय उपलब्ध आहेत. अशात सरकार नागरिकांना आकर्षित करण्यासाठी लाभही देत आहे. ज्यामध्ये या वाहनांसाठी घेण्यात आलेल्या कर्जावर 80EEB अंतर्गत कर सूट दिली जाईल. ग्राहकांना इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर 1,50,000 रुपयांपर्यंत आयकर वाचवण्याची संधी मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे ही सूट केवळ कर्जाच्या व्याजावर उपलब्ध आहे, कर्जाच्या मूळ रकमेवर नाही.

कसा मिळेल लाभ?इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही वित्तीय संस्था किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपनीकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. हे कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 दरम्यान कधीही मंजूर केले गेले असावे. याचा योजनेचा फायदा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही कारणांसाठी मिळू शकतो, असे नीरज भगत अँड कंपनीच्या एमडी रुचिका भगत यांनी सांगितले.

पहिल्यांदा मिळते सूटकेवळ वैयक्तिक करदाते ही सूट घेऊ शकतात. या कपातीसाठी अन्य कोणताही करदाता पात्र नाही. म्हणजेच, एचयूएफ, एओपी, पार्टनरशीप फर्म, कंपनी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे करदाते याचा लाभ घेऊ शकत नाहीत. तुम्ही या सवलतीचा लाभ एकदाच घेऊ शकता.

 

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरइन्कम टॅक्स