Lokmat Money >आयकर > GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली

GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली

GST Collection September 2024: यापूर्वी ऑगस्टमध्ये 1.75 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 08:58 PM2024-10-01T20:58:31+5:302024-10-01T20:58:59+5:30

GST Collection September 2024: यापूर्वी ऑगस्टमध्ये 1.75 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.

GST Collection: 6.5 percent increase in GST collection; 1.73 lakh crore was recovered in the month of September | GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली

GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली

GST Collection September 2024 : सरकारने सप्टेंबर महिन्यातील GST संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. मंगळवारी(1 ऑक्टोबर) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर 6.5 टक्क्यांच्या वाढीसह जीएसटी संकलन 1.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.62 लाख कोटी रुपये होते. तर, या वर्षी ऑगस्टमध्ये ते 1.75 लाख कोटी रुपये होते.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये देशांतर्गत कर महसूल 5.9 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.27 लाख कोटी रुपये झाला आहे. तर, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल आठ टक्क्यांनी वाढून 45,390 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

31 टक्के अधिक परतावा जारी 
या कालावधीत जीएसटी विभागाकडून 20,458 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला, जो एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 31 टक्के अधिक आहे. परताव्याची रक्कम समायोजित केल्यानंतर, सप्टेंबरमध्ये निव्वळ जीएसटी महसूल 1.53 लाख कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 3.9 टक्के अधिक आहे.

पहिल्या सहामाहीत 10.72 लाख कोटी रुपयांचे संकलन
2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात, म्हणजेच एप्रिलमध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले, जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे. मात्र त्यानंतर संकलनात घट झाली. मे 2024 मध्ये 1.73 लाख कोटी रुपये, जूनमध्ये 1.6 लाख कोटी रुपये, जुलै 2024 मध्ये 1.82 लाख कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये 1.74 लाख कोटी रुपये संकलन झाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण जीएसटी संकलन 10.72 लाख कोटी रुपये झाले आहे.

Web Title: GST Collection: 6.5 percent increase in GST collection; 1.73 lakh crore was recovered in the month of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.