Lokmat Money >आयकर > १४८ वस्तूंवरील GST दरात होणार बदल; जाणून घ्या काय महाग आणि स्वस्त?

१४८ वस्तूंवरील GST दरात होणार बदल; जाणून घ्या काय महाग आणि स्वस्त?

GST Rate Rationalisation : सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी, GST दर तर्कसंगत करण्यावर मंत्री गटाने आपला अहवाल अंतिम केला आहे. यामध्ये १४८ वस्तूंवरील कर दरांमध्ये मोठे बदल करण्याची शिफारस केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:18 PM2024-12-03T13:18:19+5:302024-12-03T13:30:25+5:30

GST Rate Rationalisation : सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी, GST दर तर्कसंगत करण्यावर मंत्री गटाने आपला अहवाल अंतिम केला आहे. यामध्ये १४८ वस्तूंवरील कर दरांमध्ये मोठे बदल करण्याची शिफारस केली आहे.

gst rate rationalisation gom proposes rate tweaks on 148 items | १४८ वस्तूंवरील GST दरात होणार बदल; जाणून घ्या काय महाग आणि स्वस्त?

१४८ वस्तूंवरील GST दरात होणार बदल; जाणून घ्या काय महाग आणि स्वस्त?

GST Rate Rationalisation : एकीकडे महागाई तर दुसरीकडे कर्जांचे वाढते हप्ते अशा दुहेरी कात्रीत सर्वसामान्य ग्राहक सापडला आहे. यातून आता थोडा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात बदल सूचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या मंत्री गटाने आता एक यादी सरकारकडे सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक वस्तू महाग आणि स्वस्त होऊ शकतात. कारण सरकार या वस्तूंवरील जीएसटी दर बदलणार आहे. जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने अनेक वस्तूंवरील दर वाढवण्याची किंवा कमी करण्याची शिफारस केली आहे.

मंत्री गटाच्या अहवालावर २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. GST दर तर्कसंगत करण्यावर मंत्री गटाने (GoM) आपला अहवाल अंतिम केला आहे. ज्यामध्ये १४८ वस्तूंवरील कर दरांमध्ये व्यापक बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे. सूत्रांनुसार, मंत्री गटाने सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी कापड, सायकल, व्यायामाची पुस्तके यासारख्या वस्तूंवरील दर कमी करण्याची काळजी घेतली आहे. तर अनेक लक्झरी वस्तूंचे दर २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

कपडे महागणार?
मंत्री गटाने एक सुधारित स्लॅब रचना सुचविली आहे. यात १५०० रुपयांपर्यंतच्या कपड्यांसाठी ५ टक्के कर दर ठेवण्यात आला आहे. परंतु, १५०० ते १०००० रुपयांपर्यंतच्या उत्पादनांसाठी १८ टक्के कर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. १०००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांसाठी, लक्झरी वस्तूंच्या बरोबरीने २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

घड्याळे आणि शूज महाग होणार
महागड्या मनगटी घड्याळ आणि शूजसह अनेक लक्झरी वस्तूंवर जीएसटी दर वाढवण्याची सूचना मंत्र गटाने केली आहे. दरम्यान, अत्यावश्यक उत्पादने परवडणाऱ्या दरात आणण्यासाठी सायकल, व्यायामाची पुस्तके आणि पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे मोठे पॅक यासारख्या वस्तूंवरील GST कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. २५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर जीएसटी दर १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे १५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शूजवरील करात वाढ होणार असून, त्याचा दर १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

सायकल होणार स्वस्त
दुसरीकडे, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दिलासा देण्यासाठी, १०००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलीवरील GST १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. व्यायामाची पुस्तके आणि २० लिटरपेक्षा जास्त पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यावरील जीएसटी देखील अनुक्रमे १२ आणि १८ टक्क्यांवरून ५ टक्के कमी केला जाईल.

हानिकारक उत्पादनांवरील जीएसटी
मंत्री गटाने सोमवारी थंड पेय, सिगारेट आणि तंबाखू यांसारख्या हानिकारक उत्पादनांवरील कराचा दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा गट स्थापन करण्यात आला आहे.
 

Web Title: gst rate rationalisation gom proposes rate tweaks on 148 items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.