पुणे : यंदापासून प्राप्तिकर चुकविणाऱ्यांना चाप बसणार आहे. आयकर विभागातर्फे खास ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून कर चुकविणाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. यंदा प्रथमच ‘एआय’चा वापर होणार असल्याने कर चुकविता येणार नाही. आयकर विभागाने केंद्रीय स्तरावर ‘एआय’चे सॉफ्टवेअर तयार करून घेतले आहे. त्याच्या वापरासाठी मान्यताही मिळाली आहे. पॅन कार्डशी संबंधित सर्व व्यवहारांची माहिती त्यातून मिळणार आहे.
...तर भरावा लागेल ५ हजारांचा दंड३१ जुलैपर्यंत आयकर विवरण भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
३.०६ काेटी आयकर विवरण १८ जुलैपर्यंत दाखल झाले हाेते.१.५० काेटी विवरणांवरील प्रक्रिया पूर्ण झाली.२.८१ काेटींपेक्षा जास्त विवरणांची पडताळी झाली आहे.
‘एआय’ काय करणार?nअगोदर पॅन कार्डवरून तुमच्या व्यवहारांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याशी, आर्थिक व्यवहारांची तपासणी होईल. nफिक्स डिपॉझिट, क्रेडिट, व्याज, शेअर डिव्हिडंट, म्युच्युअल फंड आदींविषयी माहिती संकलित होईल. nडेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, परदेशवारी, वाहन खरेदीची पडताळणी होईल.
जो आयकर घोषित केलेला आहे आणि जो लपवून ठेवला आहे, तोदेखील आपोआप ‘एआय’मध्ये सापडेल. त्यांच्याकडून त्याचा आयकर वसूल केला जाईल. - चंद्रशेखर चितळे, अर्थतज्ज्ञ