ITR Filing Process: आयकर विभागाने वार्षिक 3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing Process) भरण्याचं आवाहन केलं आहे. आयकर विभागानं 31 जुलै 2023 ही आर्थिक वर्ष-2022-23 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे.
आयकर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात आयकर रिटर्न भरण्यासाठी जवळपास सर्व उत्पन्न गटातील करदात्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. त्याच वेळी, पगारदार करदात्यांना त्यांच्या कंपन्यांकडून आवश्यक फॉर्म-16 देखील जारी करण्यात आला आहे. काही कंपन्या सध्या हा फॉर्म जारीदेखील करत आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि फॉर्म-16 प्राप्त मिळाला असेल, तर उर्वरित आवश्यक कागदपत्रांच्या मदतीनं वेळ न घालवता ITR फाइल करा. जर याची अंतिम तारीख निघून गेल्यास विभागाची नोटीस आणि दंडाला सामोरे जावे लागू शकते.
ऑफलाइन कसं भराल?
करदात्यांना प्रथम आयकर विभागाच्या आयटीआर फाइलिंग वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर लॉग इन करावे लागेल. यानंतर, डाउनलोड पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही आयटीआर फॉर्मच्या एक्सेल युटिलिटीला डाऊनलोड करू शकता. युटिलिटीमधील सर्व आवश्यक कॉलम भरा. यानंतर, सर्व शीट्स व्हॅलिडेट करा आणि कॅल्क्युलेट टॅक्स वर क्लिक करा. यानंतर XML युटिलिटी जनरेट होईल ती सेव्ह करा. आता पोर्टलवर ई-फायलिंगसाठी एक्सेल युटिलिटी अपलोड करता येईल. उपलब्ध 6 पर्यायांमधून ITR ची पडताळणी पूर्ण करा आणि नंतर फॉर्म सबमिट करा.
ऑनलाइन आयटीआर कसा फाईल कराल ?
- प्रथम Incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
- त्यानंतर व्ह्यू रिटर्न किंवा फॉर्मवर क्लिक करा.
- ई-फाइल कर रिटर्न पाहा.
- यानंतर, पेजवर असेसमेंट इयर, आयटीआर फॉर्म नंबर, फाइलिंग टाईप ओरिजिनल/रिवाइज्ड रिटर्न पर्याय निवडा.
- यानंतर continue वर क्लिक करा आणि विचारेलेली माहिती भरा.
- टॅक्स पेड आणि व्हेरिफिकेशन पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला तुमच्यानुसार पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर प्रीव्ह्यू करा आणि फॉर्म नीट तपासून सबमिट करा.
(टीप - आयटीआर फाईल करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या युझर मॅन्युअलमध्ये उपलब्ध असलेली माहिती पाहा.)