Join us  

ITR Filling FY 2024: फॉर्म १६ मिळाला नसेल तर बँकांची मदत घ्या! पाहा कुठून आणि कसा डाऊनलोड करता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 2:04 PM

ITR Filling FY 2024: तुम्हाला कंपनीने फॉर्म-१६ वेळेत दिला नसेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येतो. जाणून घेऊया कसा करू शकाल..

आयकर विवरण पत्र (आयटीआर) दाखल करण्यासाठी फॉर्म-१६ हवा असतो. तुम्हाला कंपनीने फॉर्म-१६ वेळेत दिला नसेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येतो. 

फॉर्म-१६ मध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात आलेल्या टीडीएसचे विवरण असते. जास्तीचा आयकर कापला गेला असेल, तर तो परत मिळण्यासाठी हे टीडीएस प्रमाणपत्र आवश्यक असते. ते उपलब्ध नसल्यास बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या वेबसाइटवर तो उपलब्ध आहे.असा फाॅर्म १६ डाऊनलोड करा...

एसबीआय

वेबसाईटवर आपल्या खात्यात लॉग-इन करा.‘माय सर्टिफिकेट्स’ पर्यायावर जाऊन ‘ई-सर्व्हिसेस’चा पर्याय निवडा.‘इंटरेस्ट सर्टिफिकेट ऑन डिपॉझिट अकाउंट्स’वर क्लिक करा.वित्त वर्ष निवडून सबमिट करा. ‘फॉर्म-१६ ए’ची पीडीएफ डाऊनलोड करा.

एचडीएफडीसी

एचडीएफसी बँकेची वेबसाइट https://netbanking.hdfcbank.com/netbanking/ वर लॉग-इन करा.‘इन्क्वायर’वर जाऊन ‘टीडीएस इन्क्वायरी’वर क्लिक करावे.वित्त वर्ष निवडीनंतर टीडीएस प्रमाणपत्र डाउनलोड करू शकाल.

आयसीआयसीआय 

वेबसाइट www.icicibank.com वर जाऊन लॉग-इन करा.‘टॅक्स सेंटर’वर ‘पेमेंट्स अँड ट्रान्सफर’ निवडा.पेजवर ‘टीडीएस सर्टिफिकेट’वर क्लिक करा.पॅन कार्ड तपशील भरा. टीडीएस प्रमाणपत्राची पीडीएफ डाऊनलोड करा.

टॅग्स :इन्कम टॅक्स