Lokmat Money >आयकर > टॅक्स रिफंड आला नसेल तर 'हे' काम करा, बँक अकाऊंटमध्ये येईल Tax Refund

टॅक्स रिफंड आला नसेल तर 'हे' काम करा, बँक अकाऊंटमध्ये येईल Tax Refund

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै रोजी संपली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 02:52 PM2023-08-30T14:52:57+5:302023-08-30T14:53:26+5:30

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै रोजी संपली.

If the tax refund is not received do this process the tax refund will come in the bank account | टॅक्स रिफंड आला नसेल तर 'हे' काम करा, बँक अकाऊंटमध्ये येईल Tax Refund

टॅक्स रिफंड आला नसेल तर 'हे' काम करा, बँक अकाऊंटमध्ये येईल Tax Refund

How to get ITR Refund fast : आर्थिक वर्ष २०२२-२३ (AY 2023-24) साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै रोजी संपली. ज्या लोकांनी आयटीआर दाखल केला आणि ज्यांना रिफंड मिळणार आहे, त्यांच्या मनात हा रिफंड केव्हा जमा होणार याबाबत प्रश्न आहे.

जेव्हा करदात्याद्वारे आयटीआर ई व्हेरिफाय केलं जातं त्यानंतर आयकर विभाग रिटर्नची प्रक्रिया सुरू करतं. करदात्याच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा होण्यासाठी सरासरी ४ ते ५ आठवड्यांचा कालावधी लागतो. काही वेळा रिटर्न दाखल केल्यानंतर ७ ते ८ दिवसांमध्ये टॅक्स रिफंड प्रोसेस केला जातो असंही दिसून आलंय. अशात काही टॅक्सपेयर्सना १५ दिवसांतही रिफंड मिळून जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

ITR प्रोसेससाठी किती कालावधी लागतो
आयकर कायद्यानुसार ज्या आर्थिक वर्षात आयटीआर दाखल केला गेला त्या महिन्याच्या अखेरपासून ९ महिन्यांमध्ये नोटीस जारी केली गेली पाहिजे. १ एप्रिल २०२१ पासून प्रभावी आयटीआर प्रोसेस करणं आणि नोटीस जारी करण्याचा कालावधी ३ महिन्यांनी कमी करण्यात आलाय. यासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दाखल केलेल्या आयटीआरसाठी आयकर विभागाला ३१ डिसेंबर २०२४ किंवा त्यापूर्वी नोटीस जारी करायला हवी. जर तुमचा आयटीआर ठरलेल्या तारखेपर्यंत प्रोसेस झाला नाही, तर तुम्ही इन्कम टॅक्स विभागात तक्रार दाखल करू शकता.

Web Title: If the tax refund is not received do this process the tax refund will come in the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.