आयकर भरणार्यांची एक सामान्य तक्रार असते आणि ती म्हणजे त्यांना आयकर परतावा मिळण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते. काही वेळा रिफंडचे पैसे बँक खात्यात पोहोचण्यासाठी काही दिवसांऐवजी काही महिने लागतात. आयकर विभागाचा दावा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये परतावा जारी करण्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पण, लवकर परतावा न मिळाल्यानं अजुनही अनेकजण नाराज दिसतात. ही नाराजी पाहता आयकर विभाग आता रिफंड देण्यासाठी ठोस यंत्रणा तयार करत आहे. करदात्यांच्या आयटीआरची पडताळणी केल्यानंतर एका आठवड्यात परतावा बँक खात्यात टाकण्याची विभागाची योजना आहे.
आयकर विभागाचा दावा आहे की आता टॅक्स रिफंडची प्रक्रिया आणि ते जारी करण्यासाठी फक्त १६ दिवस लागतात. आता हा कालावधी १० दिवसांपर्यंत कमी करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी यंत्रणा उभारण्याची तयारी सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे याचा चालू आर्थिक वर्षापासूनच घेता येणारे.
त्वरित रिफंड देण्याचं लक्ष्य बिझनेस स्टँडर्ड्सच्या एका रिपोर्टनुसार, आयकर विभागानं कर परताव्याच्या पडताळणी आणि मूल्यांकनासाठी इलेक्ट्रॉनिक अप्रोच स्वीकारला आहे. आयकर विभागाला कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण होताच परतावा जारी करायचा आहे. आयकर विभागाचा हा नवा उपक्रम असेल.
कालावधी झालाय कमी२०२२-२३ मध्ये कर रिटर्न प्रक्रियेत सरासरी १६-१७ दिवसांचा वेळ लागला. २०२१-२२ मध्ये तो २६ दिवस होता. आता आम्ही कर परताव्याची प्रक्रिया करण्यासाठी आणि परतावा जारी करण्यासाठी लागणारा वेळ १० दिवसांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहोत, असं एका अधिकाऱ्यानं बिझनेस स्टँडर्डला सांगितलं.