Lokmat Money >आयकर > Income Tax News : कोट्यवधी करदात्यांसाठी गूड न्यूज, आता मिनिटांत फाईल होणार ITR, खटाखट येणार रिफंड 

Income Tax News : कोट्यवधी करदात्यांसाठी गूड न्यूज, आता मिनिटांत फाईल होणार ITR, खटाखट येणार रिफंड 

​​​​​​​Income Tax News : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये मोठा बदल होणार आहे. करदात्यांसाठी ते अधिक सोयीस्कर ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 08:33 AM2024-10-16T08:33:38+5:302024-10-16T08:33:38+5:30

​​​​​​​Income Tax News : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये मोठा बदल होणार आहे. करदात्यांसाठी ते अधिक सोयीस्कर ठरेल.

Income Tax News Good news for crores of taxpayers now ITR will be filed in minutes refund will come earlier | Income Tax News : कोट्यवधी करदात्यांसाठी गूड न्यूज, आता मिनिटांत फाईल होणार ITR, खटाखट येणार रिफंड 

Income Tax News : कोट्यवधी करदात्यांसाठी गूड न्यूज, आता मिनिटांत फाईल होणार ITR, खटाखट येणार रिफंड 

Income Tax News : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये मोठा बदल होणार आहे. करदात्यांसाठी ते अधिक सोयीस्कर ठरेल. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, विभागाच्या अंतर्गत परिपत्रकात नवीन आयटीआर ई-फाइलिंग पोर्टल आयईसी ३.० लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीये. त्यासाठीची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. अंतर्गत परिपत्रकानुसार, विद्यमान इंटिग्रेटेड ई-फाइलिंग अँड सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (आयईसी) २.० चा ऑपरेशन फेज संपत आहे. त्याचबरोबर आयईसी ३.० हा नवीन प्रकल्प म्हणून त्याची जागा घेईल. चला जाणून घेऊया त्याबद्दल.

काय आहे IEC प्रोजेक्ट?

आयईसी प्रोजेक्टमध्ये ई-फायलिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. यामुळे करदात्यांना आपला आयटीआर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं भरणं, नियमित फॉर्म जमा करणं आणि इतर अनेक सेवांचा वापर करणं शक्य होतं. आयईसी प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC). ई-फायलिंग पोर्टल आणि आयटीबीएच्या मदतीनं भरलेल्या आयटीआरवर प्रक्रिया करण्याची जबाबदारी घेतली जाते. याव्यतिरिक्त, आयईसी बॅक-ऑफिस (BO) पोर्टल देखील प्रदान करते. याद्वारे क्षेत्रीय अधिकारी करदात्यांच्या फाइलिंग आणि प्रोसेसिंग डेटा अॅक्सेस करू शकतात.

कशी करेल मदत?

अंतर्गत परिपत्रकात म्हटल्यानुसार प्रोजेक्ट आयईसी ३.० चं उद्दीष्ट केवळ प्रोजेक्ट आयईसी २.० द्वारे प्रदान केलेल्या सेवा सुरू ठेवण्याचं नाही. त्याऐवजी लक्षणीय चांगली व्यवस्था उभी करणं हेदेखील आहे. आयटीआरच्या प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील. नवीन प्रणाली आयटीआरच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, ज्यामुळे करदात्यांना त्वरित परतावा मिळण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, यामुळे आयईसी २.० मधील तक्रारीही कमी होऊ शकतात.

Web Title: Income Tax News Good news for crores of taxpayers now ITR will be filed in minutes refund will come earlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.