Lokmat Money >आयकर > ITR भरल्यानंतरही रिफंड मिळाला नाही? फक्त एक काम करा आणि पैसे तुमच्या बँक खात्यात

ITR भरल्यानंतरही रिफंड मिळाला नाही? फक्त एक काम करा आणि पैसे तुमच्या बँक खात्यात

ITR Refund: इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर अद्याप तुमचा टॅक्स रिफंड मिळाला नसेल तर काळजी करू नका. आम्ही सांगतो त्या स्टेप्स फोलो करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 03:36 PM2024-09-11T15:36:34+5:302024-09-11T15:39:25+5:30

ITR Refund: इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर अद्याप तुमचा टॅक्स रिफंड मिळाला नसेल तर काळजी करू नका. आम्ही सांगतो त्या स्टेप्स फोलो करा.

income tax refund taxpayer may do this process for itr refund money will come in account | ITR भरल्यानंतरही रिफंड मिळाला नाही? फक्त एक काम करा आणि पैसे तुमच्या बँक खात्यात

ITR भरल्यानंतरही रिफंड मिळाला नाही? फक्त एक काम करा आणि पैसे तुमच्या बँक खात्यात

Income Tax Refund Status: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 रोजी संपली आहे. आता करदात्यांना रिफंड मिळण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही मुदतीपूर्वी तुमचा ITR भरला असेल आणि तरीही तुम्हाला रिफंड मिळाला नसेल, तर काळजी करू नका. यामागची कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि हो तुमचा रिफंड कसा मिळवायचा याची सोपी प्रोसेसही.

आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन आवश्यक 
आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग सामान्यत: 30 ते 45 दिवसांच्या आत करदात्यांच्या बँक खात्यात टॅक्स रिफंड पाठवतो. अनेक करदात्यांच्या खात्यात पैसे आले आहेत. पण अजूनही काही करदाते रिफंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आयटीआर दाखल केल्यानंतर त्याचे ई-व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. जर तुम्ही ITR भरला असेल तर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. ते झालं नाही तर तुमचा ITR रद्द केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंड मिळणार नाही.

आयटीआर रिफंड न मिळण्याचे आणखी एक कारण
बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड यासारख्या महत्त्वाच्या माहितीत चूक झाल्यास देखील ITR रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती आयकर विभागाकडे अपडेट केली नसेल, तर तुमचा रिफंड अडकू शकतो. इतकेच नाही तर ज्या बँक खात्यात टॅक्स रिफंड मिळणार आहे, त्या खात्याचे प्री-व्हॅलिडेशन करणे देखील आवश्यक आहे.

टॅक्स रिफंड स्टेटस कसे चेक करावे?

  • सर्वप्रथम www.incometax.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  • आपला पॅनकार्ड नंबर आणि पासवर्डद्वारे लॉगइन करा.
  • ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर ई-फाइल टॅबवर जा. 
  • यानंतर व्यू फाइल्ड रिटर्न या पर्याय निवडा.
  • येथे तुम्ही फाईल केलेले सर्व रिटर्न्सची माहिती मिळेल.
  • करेंट स्टेटस पाहण्यासाठी व्यू डिटेल पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर तुमच्या स्क्रिनवर ITR फाइलचे स्टेटस माहीत होईल.
  • जर तुम्हाला रिफंड पाठवला असेल तर त्याची माहिती तुम्हाला दिसेल. 
  • तुम्हाला मोड ऑफ पेमेंट, रिफंड अमाउंट आणि डेट ऑफ क्लीयरेन्स सारखी सर्व माहिती तिथे मिळेल.

रिफंड मिळण्यास उशीर झाला असल्या इथे करा संपर्क

  • आयकर विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक 1800-103-4455 वर संपर्क साधा. 
  • ask@incometax.gov.in वर ईमेल करा. 
  • स्थानिक आयकर विभाग कार्यालयात जा आणि चौकशी करा.
  • ई-फायलिंग पोर्टल आणि NSDL वेबसाइटवर स्थिती तपासू  शकता.
  • तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन तक्रार द्या.
  • बेंगळुरूमधील सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) शी संपर्क साधता येईल.

Web Title: income tax refund taxpayer may do this process for itr refund money will come in account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.