Join us  

Income Tax Slab 2024 Changes: इन्कम टॅक्समध्ये मोठ्या बदलांची घोषणा; पण 'यांना' मिळणार नाही फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:11 PM

Income Tax Slab 2024 Changes: स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. पण कोणाला याचा फायदा मिळणार नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Income Tax Slab Changes: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. 

तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. तीन ते सात लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के, सात ते दहा लाखरुपयांच्या उत्पन्नावर दहा टक्के आणि दहा ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी जुन्या करातील मूळ सवलतीच्या मर्यादेत वाढ केली नाही, कराच्या दरात कोणताही बदल केला नाही. स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्याचा फायदाही त्यांना मिळणार नाही.

आणखी काय म्हणाल्या अर्थमंत्री?

सरकार पुढील ६ महिन्यांत आयकर कायदा १९६१ चे पुनरावलोकन करेल. आयकर प्रणाली सोपी केली जाईल, मोठ्या कर प्रकरणांच्या सुनावणीसाठी आणखी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं अर्. त्याचबरोबर सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी देवदूत कर रद्द करण्याची घोषणाही केली आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्सअर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामन