नोकरदार वर्ग इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतो. त्यासाठी ते विविध योजनांमध्ये गुंतवणूकही करतात. बहुतेक लोकांना गृहकर्जावरील (Home loan) आयकर सवलतीची (Income tax deduction) माहिती आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही वैयक्तिक कर्जावरही (Personal Loan) आयकर सूट मिळवू शकता?
प्रत्यक्ष पाहिल्यास आयकर कायद्यात वैयक्तिक कर्जाच्या सवलतीची तरतूद नाही. परंतु वैयक्तिक कर्जाची गणना आपल्या लायबलिटीच्या श्रेणीत केली जाते, उत्पन्नात नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वैयक्तिक कर्जाचा वापर असेट क्रिएशन म्हणून केला तर तुम्ही वैयक्तिक कर्जावरील कर सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता. पाहूया कशा प्रकारे वैयक्तिक कर्ज तुमचा कर वाचवू शकतो.
घराची खरेदी किंवा दुरुस्तीतुम्ही वैयक्तिक कर्जावर घेतलेली रक्कम घराच्या दुरुस्तीसाठी किंवा घर खरेदीसाठी वापरल्यास तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकता. आयकर कायदा, 1961 च्या कलम 24 अन्वये, निवासी घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट दिली जाऊ शकते. कलम 80C अंतर्गत, जेथे गृहकर्जावरील मूळ रकमेच्या देयकावर दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट घेतली जाऊ शकते, कलम 24 नुसार, घर बांधण्यासाठी/खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची तरतूद आहे.
असेट्समध्ये गुंतवणूकतुम्ही घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा वापर स्टॉक्स, दागिने, नॉन रेसिडेंन्शिअल प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी केलं तर तुम्हाला याचा फायदा घेता येतो. परंतु ज्या वर्षी व्याज फेडलं त्या वर्षी सवलत घेता येत नाही. परंतु जेव्हा तुम्ही आपली संपत्ती विकता, त्यावर्षी तुम्हाला ते क्लेम करता येतं.
व्यवसायात गुंतवणूकतुम्ही वैयक्तिक कर्जाचा वापर व्यवसायात गुंतवणूक म्हणून केला तरीही तुम्हाला करात सूट मिळू शकते. या प्रकरणात, तुम्ही खर्च म्हणून दाखवून व्याजाचा दावा करू शकता आणि कर दायित्व कमी करू शकता.
या तिन्ही प्रकरणांमध्ये, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर सवलतीचा लाभ मूळ रकमेवर नव्हे तर व्याजाच्या रकमेवरच मिळेल. याशिवाय तुम्ही वैयक्तिक कर्जाची रक्कम इतरत्र गुंतवल्यास तुम्हाला कर सवलत मिळणार नाही.