Lokmat Money >आयकर > Made in India असूनही Iphone 16 भारतात महाग का? दुबई, अमेरिकेत का मिळतोय स्वस्त?

Made in India असूनही Iphone 16 भारतात महाग का? दुबई, अमेरिकेत का मिळतोय स्वस्त?

iPhone Costly in India: आयफोन 16 हा पूर्णपणे मेड इन इंडिया आहे, असे असूनही इतर देशांच्या तुलनेत मोबाईल महाग का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 02:40 PM2024-09-23T14:40:31+5:302024-09-23T14:42:01+5:30

iPhone Costly in India: आयफोन 16 हा पूर्णपणे मेड इन इंडिया आहे, असे असूनही इतर देशांच्या तुलनेत मोबाईल महाग का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

iphone16 costly in india and iphone plus iphone 16 pro iphone 16 pro max rates are higher then usa uae | Made in India असूनही Iphone 16 भारतात महाग का? दुबई, अमेरिकेत का मिळतोय स्वस्त?

Made in India असूनही Iphone 16 भारतात महाग का? दुबई, अमेरिकेत का मिळतोय स्वस्त?

iPhone Costly in India : भारतात आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात आयफोनची विक्री २० सप्टेंबरपासून सुरू झाली. प्रमुख शहरांमधील Apple स्टोअर्सच्या बाहेर आयफोनप्रेमींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अजूनही अॅप्पल स्टोअर्समध्ये स्मार्टफोन घेण्यासाठी गर्दी होत आहे. आयफोन १६ हा पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. असे असूनही इतर देशांच्या तुलनेत तो आपल्याकडे महाग का विकला जातोय? अनेकजण आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला दुबई किंवा इतर देशातून आयफोन घेऊन येण्यास सांगत आहे. चला यामागचं कारण शोधूयात.

मेड इन इंडिया आयफोन
यावेळी Apple कंपनीने iPhone 16 सिरीजचे फोन भारतात असेंबल केल्याने ते तुलनेत स्वत मिळतील अशी आशा भारतीयांमध्ये निर्माण झाली होती. वास्तविक iPhone 16 ची विक्री सुरू होताच, भारतात iPhones महाग असल्याने ग्राहकांची निराशा झाली. यामागचं खरं कारण म्हणजे स्मार्टफोन्सवर आकारला जाणारा जीएसटी.

आयफोन इतर देशांमध्ये स्वस्त का?
Apple कंपनी आपल्या iPhone 16 सिरीजचे सर्व मॉडेल्स भारतात असेंबर करण्याची बातमी समोर आली होती. यामध्ये Pro आणि Pro Max मॉडेलचाही समावेश आहे. पहिल्यांदा Apple कंपनीने चीनबाहेर आयफोन निर्मितीला हिरवा कंदील दिला होता. वास्तविक, मेड इन इंडिया असूनही भारताच्या तुलनेत अमेरिका, यूएई, व्हिएतनाम, थायलँड आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये आयफोन 16 चे काही मॉडेल्स स्वस्त आहेत.

टॅक्सचे गणित समजून घेऊ
भारतात स्मार्टफोनवर १८ टक्के दराने कर (GST) लावला जातो. इतर देशांमध्ये तो आपल्यापेक्षा कमी असल्याने तिथे आयफोन स्वस्त मिळत आहेत. उदाहरणार्थ, यूएईमध्ये स्मार्टफोनवर केवळ ५ टक्के टॅक्स आहे. तर आपल्याकडे १८ टक्के टॅक्स लागतो. जर आपण आयफोन 16 च्या प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सकडे पाहिले तर ते आयफोन 15 च्या प्रो आणि प्रो-मॅक्स फोनच्या तुलनेत तुलनेने स्वस्त आहेत. त्यावर ७.६ टक्के किंवा ९,९०० रुपये कमी शुल्क लागल्याने ते स्वस्त झाले आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पात स्मार्टफोनवरील शुल्क कमी केल्याने हा प्रकार घडला आहे. आयफोन 15 च्या तुलनेत आयफोन 16 चे दर बघितले तर त्या तुलनेत ते सुमारे १५,००० रुपयांनी स्वस्त आहे.

Web Title: iphone16 costly in india and iphone plus iphone 16 pro iphone 16 pro max rates are higher then usa uae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.