Join us  

आता ITR भरणे झालं अवघड? १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल; काय आहे नवीन नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 11:13 AM

Aadhaar Card Rule : आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये काही बदलही लागू झाले आहेत. आधार कार्डमधील हे बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्येच जाहीर केले होते.

Aadhaar Card Rule : १ ऑक्टोबरपासून देशभरात अनेक मोठे बदल झाले आहेत. यातील बहुतांश बदल आयकराच्या बाबतीत झाले आहेत. १ ऑक्टोबरपासून देशात आधार कार्डपासून ते आयकरापर्यंतच्या नियमांमध्ये बदल लागू झाले आहेत. आयकर भरण्यासाठी आधारकार्ड खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. मात्र, याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने या नियमात बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला या बदलाची माहिती असणे आवश्यक आहे. आधार कार्डमधील हे बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्येच जाहीर केले होते. 

आधार कार्डचे नवीन नियम काय आहेत?आत्तापर्यंत प्रत्येकजण आधार कार्डच्या नावनोंदणी क्रमांकाचा वापर पॅन कार्ड बनवण्यासाठी करत आहेत. आयकर परतावा (ITR) भरण्यासाठी देखील आधार कार्डचा नोंदणी क्रमांक वापरला जात होता. मात्र, केंद्र सरकारने हा नियम बदलला आहे. वास्तविक, आता लोकांना पॅन कार्ड बनवण्यासाठी आणि आयकर भरण्यासाठी आधार कार्डचा एनरोलमेंट नंबर वापरता येणार नाही. तुम्ही आतापर्यंत पॅनकार्ड बनवले नसेल तर तुम्ही आता एनरोलमेंट नंबर वापरून ते घेऊ शकता.

का बदलले नियम?आधारकार्ड नावनोंदणी क्रमांकाचा वापर करुन पॅनकार्ड किंवा आयकर परतावा भरल्यास आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो. यातून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत आधार कार्डचा गैरवापर रोखणे हा या नव्या नियमाचा उद्देश आहे. 

मोफत आधारकार्ड अपडेटची तारीख वाढवलीआधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२४ होती. मात्र, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. १४ डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्ही आधार कार्ड मोफत अपडेट करु शकतात. त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नाही. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढवली आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तुमचे आधार कार्ड अपडेट करता येईल. तुमच्या आधार कार्डमध्ये जर कोणती चूक किंवा तुम्हाला माहिती बदलायची असेल तर ते मोफत अपडेट करता येणार आहे.

टॅग्स :आधार कार्डइन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयपॅन कार्ड