Lokmat Money >आयकर > ITR भरण्याची वेळ आलीये, तयारी करा सुरू; 'या' डॉक्युमेंट्सची भासेल गरज, पटापट करा चेक

ITR भरण्याची वेळ आलीये, तयारी करा सुरू; 'या' डॉक्युमेंट्सची भासेल गरज, पटापट करा चेक

ITR Filing 2024: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता जवळ आली आहे. ३१ जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख आहे. परंतु ITR भरण्यापूर्वी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ते जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:24 PM2024-06-19T13:24:05+5:302024-06-19T13:25:24+5:30

ITR Filing 2024: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता जवळ आली आहे. ३१ जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख आहे. परंतु ITR भरण्यापूर्वी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ते जाणून घेऊ.

itr-filing-2024-last-date-documents-to-be-needed-for-income-tax-return-form-16-pan-card-aadhaar-linking-mandetory-26as-full-list-tax-department | ITR भरण्याची वेळ आलीये, तयारी करा सुरू; 'या' डॉक्युमेंट्सची भासेल गरज, पटापट करा चेक

ITR भरण्याची वेळ आलीये, तयारी करा सुरू; 'या' डॉक्युमेंट्सची भासेल गरज, पटापट करा चेक

ITR Filing 2024: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता जवळ आली आहे. ३१ जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख आहे. तुम्ही जितक्या लवकर रिटर्न दाखल कराल तितक्या लवकर तुमच्या खात्यात रिफंड येईल. परंतु, रिटर्न भरण्यापूर्वी त्याची तयारी करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला आयटीआरशी संबंधित कागदपत्रांची यादी तयार करावी लागेल. पण तुम्हाला माहितीये का यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि तुम्हाला त्यांची गरज का आहे. 
 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयटीआरची कागदपत्रं वेगवेगळ्या करदात्यांसाठी वेगवेगळी असतात. यामध्ये तुमचं उत्पन्न आणि गुंतवणूक वेगवेगळी असते. परताव्यासाठी लागणारी कागदपत्रं ३ भागांत विभागली तर सोपं होईल. पहिला- इन्कम अँड इनव्हेस्टमेंट प्रूफ, दुसरा- टॅक्स स्टेटमेंट आणि तिसरा पर्सनल डीटेल्स.


१. इन्कम अँड इनव्हेस्टमेंट प्रूफ
 

  • आयटीआर भरताना तुम्हाला एका आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळालं आहे आणि कुठे गुंतवणूक केली आहे, हे सांगावं लागतं.
  • आयकर कायद्याच्या कलम ८० सी मध्ये समाविष्ट असलेल्या टॅक्स सेव्हिंग टूल्स जसे की एफडी, ईएलएसएस इत्यादींमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांच्याशी संबंधित कागदपत्रं तयार ठेवा.
  • जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर येथे कर सवलतही मिळते. तुम्ही मूळ रकमेवर भरलेल्या व्याजावर टॅक्स डिडक्शनचा दावा करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला होम लोन स्टेटमेंट दाखवावं लागेल.
    तुम्हाला भाड्याद्वारे उत्पन्न आलं तर ते जाहीर करावं. जर तुम्ही भाड्यानं राहत असाल तर तुमच्या घरमालकाकडून बिलाची पावती नक्की घ्या, यामुळे तुमचा टॅक्स वाचू शकतो. आपल्याला ही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही, परंतु ती असल्यास सुरक्षित ठेवा.
  • शिवाय शेअर्स, सिक्युरिटी किंवा प्रॉपर्टी विकून पैसे कमावले असतील तर त्याचा खुलासा करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ब्रोकर स्टेटमेंट, प्रॉपर्टी सेल डीड वगैरे द्यावं लागेल. जर तुम्ही डिव्हिडंडमधून कमाई केली असेल तर तुम्ही ते डिमॅट अकाऊंट स्टेटमेंटद्वारे दाखवू शकता.
     

२. फॉर्म १६
 

आता फॉर्म १६ बद्दल जाणून घेऊ. पगारदार कर्मचारी याची विशेष वाट पाहत आहेत. त्यांच्या बाबतीत, कंपनी पगार आणि टीडीएस कपातीचा तपशील जारी करते. यात दोन भाग आहेत - ए आणि बी, भाग ए मध्ये किती कर कापला जातो, नियोक्त्याचं पॅन आणि टॅन काय आहे, याची माहिती असते. भाग बी मध्ये ग्रॉस सॅलरी ब्रेकअप, एक्झम्पशन इत्यादींचा तपशील असतो.
 

Form-16A/Form-16B/Form-16C
 

वेतन, व्याज आदींचा उल्लेख फॉर्म १६ ए मध्ये असते. त्याचबरोबर जर तुम्ही प्रॉपर्टी विकत असाल तर तुमचा खरेदीदार तुम्हाला फॉर्म १६ बी देतो. फॉर्म १६ सी मध्ये भाड्यावरील टीडीएस कपातीचा तपशील असतो.
 

फॉर्म 26 एएस आणि एआयएस
 

फॉर्म २६ एएस टॅक्स पासबुकसारखाच आहे. यामध्ये तुम्ही भरलेल्या कराचा सविस्तर तपशील असतो. टीडीएस कापला तर तो त्यात रिफ्लेक्ट होतो, जर तुम्हाला परतावा घ्यायचा असेल तर या फॉर्ममधील सर्व तपशील योग्य आहेत की नाही हे पाहावं लागेल. त्याचप्रमाणे, अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (Annual Information Statement) देखील तुमच्या टॅक्सची कुंडलीच आहे. त्यामध्ये टॅक्स डिडक्शन, लायाबलिटीपासून तुमची सर्व माहिती मिळते.
 

३. पर्सनल डिटेल्स
 

पॅन कार्ड बंधनकारक - आयकर विभागाकडून पॅन जारी केलं जातं. हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केल्यास रिटर्न भरणं सोपं जातं. आयटी कायद्याच्या कलम १३९ एए नुसार करदात्यांना आयटीआर भरताना आधार क्रमांक देणं बंधनकारक आहे.
 

बँक डिटेल्स- बँक स्टेटमेंट/पासबुक
 

आयटीआर फाइलिंगसाठी तुमच्या बँक खात्याचा सर्व तपशील द्यावा लागेल. बँकेचं नाव, खाते क्रमांक, आयएफएससी आणि तुमची किती खाती आहेत, या सर्वांचा उल्लेख करावा लागतो. तुम्हाला कोणत्या खात्यात टॅक्स रिफंड हवा आहे, हेही सांगावं लागेल. तसंच तुम्हाला बँक स्टेटमेंट किंवा पासबुकची प्रत द्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही एका आर्थिक वर्षात बचत खात्यावरील व्याजातून किती कमाई केली हे तपासता येतं.

Web Title: itr-filing-2024-last-date-documents-to-be-needed-for-income-tax-return-form-16-pan-card-aadhaar-linking-mandetory-26as-full-list-tax-department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.