Lokmat Money >आयकर > NPS Benefits : ‘या’ पाच कारणांमुळे एनपीएसमध्ये करा गुंतवणूक, Tax मध्ये मिळतो ट्रिपल फायदा

NPS Benefits : ‘या’ पाच कारणांमुळे एनपीएसमध्ये करा गुंतवणूक, Tax मध्ये मिळतो ट्रिपल फायदा

National Pension System : NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम ही रिटायरमेंटबाबत एक उत्तम योजना मानली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 03:16 PM2023-02-28T15:16:34+5:302023-02-28T15:20:51+5:30

National Pension System : NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम ही रिटायरमेंटबाबत एक उत्तम योजना मानली जाते.

NPS Benefits Invest in NPS for these five reasons get triple benefit in Tax investment tips know details your money income tax | NPS Benefits : ‘या’ पाच कारणांमुळे एनपीएसमध्ये करा गुंतवणूक, Tax मध्ये मिळतो ट्रिपल फायदा

NPS Benefits : ‘या’ पाच कारणांमुळे एनपीएसमध्ये करा गुंतवणूक, Tax मध्ये मिळतो ट्रिपल फायदा

National Pension System : NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) ही रिटायरमेंटबाबत एक उत्तम योजना मानली जाते. या योजनेत १८ ते ७० वर्षे वयापर्यंत योगदान दिले जाते. या योगदानावर अनेक प्रकारचे कर लाभ उपलब्ध आहेत. यासोबतच तुमचे भविष्यही सुरक्षित आहे. NPS ही सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करण्याचा एक सिस्टमॅटिक प्लॅन आहे. निवृत्तीनंतर तुमच्या भविष्यासाठी एक मोठा फंड तयार केला जातो. NPS चे व्यवस्थापन PFRDA म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे केले जाते. NPS मध्ये गुंतवणूक का करावी, हे पाच पॉईंट्समध्ये समजून घेऊ.

  1. NPS Investment म्हणजेच एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कलम ८० सी अंतर्गत डिडक्शनचा फायदा मिळतो. याची मर्यादा १.५ लाख रुपये आहे.
  2. एनपीएस इन्व्हेस्टमेंटवर ८०सीसीडी(१बी) अंतर्गतही बेनिफिट्स मिळतात. हे ८० सी द्वारे मिळणाऱ्या बेनिफिट्सपेक्षा निराळे आहे. या अंतर्गत ५० हजार रुपयांचं डिडक्शन मिळतं. तसंच एकूण २ लाख रुपयांचे टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.
  3. ८०सीसीडी(२) अंतर्गतही एनपीएसवर टॅक्स बेनिफिट्स मिळतात. याअंतर्गत कोणी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉयीच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करत असेल तर त्या एम्प्लॉयीला करात सूट मिळते. ८० सी च्या व्यतिरिक्त याचा फायदा मिळतो. याची मर्यादा ७.५० लाख रुपये किंवा वेतनाचे १० टक्के असू शकते.
  4. नॅशनल पेन्शन सिस्टम EEE कॅटेगरीअंतर्गत येते. गुंतवणूक करण्यावर टॅक्स बेनिफिटही मिळतं. रिटर्न आणि मॅच्युरिटी अमाऊंटही पूर्णपणे टॅक्स फ्री असते.
  5. एनपीएसही सर्वात स्वस्त पेन्शन स्कीम आहे. दीर्घ कालावधीत कम्पाऊंडिंगचा लाभही मिळतो. यामुळे तुमच्या भविष्यासाठी मोठा कॉर्पस तयार होतो. यामध्ये ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. 

Web Title: NPS Benefits Invest in NPS for these five reasons get triple benefit in Tax investment tips know details your money income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.