Income Tax Return : अनेक व्यक्तींना माहिती आहे की, त्यांचे करपात्र उत्पन्न आयकरातून दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या मर्यादपेक्षा अधिक असले तर आयटीआर दाखल करणे बंधनकारक असते; परंतु काही विशिष्ट स्थितीमध्ये आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न दिलेल्या सवलतीच्या मर्यादपेक्षा कमी असले तरीही आयटीआर दाखल करणे बंधनकारक असते. ३१ जुलैच्या आत आयटीआर दाखल न केल्यास त्यांना दंड बसू शकतो, असे कर सल्लागार सांगतात.
परदेशी मालमत्ता किंवा उत्पन्न बाळगणे
अनेक जण परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यातून लाभांश मिळतो. कलम २३९ (१) नुसार परदेशी कंपन्यांचे बाँड, शेअर्स तसेच परदेशात घर असलेले, यातून व्याज किंवा भाडे आदी असे उत्पन्न मिळणाऱ्यांना रिटर्न भरणे बंधनकारक आहे.
परदेशी प्रवासावर २ लाख खर्च
जर एखाद्याने परदेशी प्रवासावर २ लाख किवा त्याहून अधिक खर्च केला असेल त्यांना रिटर्न दाखल करावे लागते. यात संपूर्ण आर्थिक वर्षात तसेच केवळ एकाच वेळी केलेल्या खर्चाचा समावेश असतो.
एक लाखापेक्षा जादा वीज बिल
जर करदात्याने वीज बिलापोटी एकाच वेळी १ लाख किंवा त्यापेक्षा जादा रकम भरली असेल तर रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे.
जादा टीडीएस किंवा टीसीएस
आयकर विभागाने एप्रिल २०२२ मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार २५ हजारांपेक्षा जादा टीडीएस किंवा टीसीएस ज्यांचा कापला गेला आहे. त्यांनाही आयटीआर अनिवार्य आहे.
भांडवली उत्पन्न सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असणे
एखाद्या व्यक्तीचे एकूण भांडवली उत्पन्न सवलतीच्या मयदिपेक्षा जास्त असल्यास रिटर्न अनिवार्य असते,
चालू खात्यात एक कोटी जमा
स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीने चालू खात्यात १ फोटी किवा त्यापेक्षा अधिक क्कम जमा केल्यास रिटर्न अनिवार्य आहे.
आयकर परतावा मिळविण्यासाठी दावा
काही वेळा व्यक्तीचे उत्पन्न तसेच लाभांशातून जादा कर घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत आयकर परताव्यावर दावा करायचा असेल तर त्या व्यक्तीला रिटर्न दाखल करणे बंधनकारक असते.