Loan Campaign: असे अनेक लोक आहेत जे आपल्या कमाईतून आपल्या आर्थिक गरजा भागवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. काही लोक घर घेण्यासाठी गृहकर्ज घेतात, तर काही जण कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेतात. तर काही लोक आपल्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतात. देशातील विविध बँकांकडून वेगवेगळ्या व्याजदरानं विविध प्रकारची कर्जे दिली जातात. आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेनं कर्जासाठी एक कॅम्पेन सुरू केलंय. पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीनं हे लोन कॅम्पेन सुरू केलंय. 'पीएनबी निर्माण २०२५' असे या कॅम्पेनचं नाव आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
पीएनबी निर्माण २०२५ लोन कॅम्पेन
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या पीएनबीनं मर्यादित लोकांसाठी 'पीएनबी निर्माण २०२५' नावाचं विशेष रिटेल लोन कॅम्पेन सुरू केलं आहे. ही मोहीम २० जून २०२५ पर्यंत चालणार आहे. या मोहिमेत लोकांना स्वस्त व्याजदरात आणि अनेक सवलतींसह कर्ज दिलं जाईल. या कॅम्पेनमध्ये होमलोन, कार लोन आणि एज्युकेशन लोन यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. यामध्ये तुम्हाला अतिशय कमी व्याजदरात कर्ज मिळू शकतं.
काय आहे खास?
पीएनबी निर्माण २०२५ कॅम्पेनमध्ये देण्यात आलेल्या कार आणि होम लोनमध्ये ग्राहकांकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही. त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन चार्जेसही शून्य आहेत. एवढंच नाही तर याअंतर्गत ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा जास्त रकमेच्या गृहकर्जावर वकिलाकडून नॉन इन्कमबेन्सी सर्टिफिकेट किंवा एनईसीचाही लाभ मोफत मिळणार आहे.